SBI Jobs: लागा तयारीला! SBI देणार 10 हजार नोकऱ्या, बड्या अधिकाऱ्याने सांगितले कोणती पदे भरणार

Technical Job In SBI: मार्च 2024 पर्यंत एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2,32,296 होती. यामध्ये 1,10,116 लोक बँक अधिकारी पदावर आहेत.
SBI logo with a graphic indicating 10,000 job openings.
SBI announces 10,000 job openings, paving the way for aspiring candidates in the banking sector.Esakal
Updated on

देशातील सर्वात मोठी कर्ज पुरवठादार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चालू आर्थिक वर्षात सुमारे 10,000 नवीन कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी देणार आहे. बँकेने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तसेच त्यांचे डिजिटल चॅनेल ग्राहकांना सोप्या पद्धतीने वापरता यावे यासाठी तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

एसबीआयचे अध्यक्ष सीएस शेट्टी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्हाला आमची बँकिंग सुविधा तांत्रिकदृष्ट्या मजबूत करायची आहे. अलीकडेच आम्ही तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित 1,500 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.

शेट्टी म्हणाले, "आमच्या या भरतीमध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा आर्किटेक्ट आणि नेटवर्क ऑपरेटर अशा विविध पदांचा समावेश आहे. इथून पुढे आम्ही तंत्रज्ञान पदांवर अधिक भरती करणार आहे. या आर्थिक वर्षात आम्ही 8,000-10,000 कर्मचाऱ्यांची भरती करू शकतो. यामध्ये सामान्य आणि विशेष पदेही असतील."

मार्च 2024 पर्यंत एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2,32,296 होती. यामध्ये 1,10,116 लोक बँक अधिकारी पदावर आहेत.

क्षमता वाढीबाबत बोलताना शेट्टी म्हणाले की, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कौशल्ये शिकवली जातात, जेणेकरून ते ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करू शकतील. ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत, तंत्रज्ञान बदलत आहे. आता सर्व काही डिजिटल झाले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सर्व स्तरावर प्रशिक्षण देत आहोत.

सीएस शेट्टी म्हणाले की, "नवीन भरती व्यतिरिक्त, एसबीआयने देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये नवीन शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या आर्थिक वर्षात आम्ही बँकेच्या अंदाजे 600 नवीन शाखा उघडणार आहोत."

मार्च 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात SBI च्या 22,542 शाखा आहेत.

SBI logo with a graphic indicating 10,000 job openings.
Viral Video: मुंबईच्या वडापाव विक्रेत्याचे उत्पन्न ऐकून कॉर्पोरेट लोकांना बसेल धक्का; सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

सीएस शेट्टी म्हणाले की, "शाखा विस्तारासाठी आमची विशेष योजना आहे. अनेक मोठ्या सोसायट्या आणि वसाहतींमध्ये आमच्या शाखा नाहीत. या आर्थिक वर्षात आम्ही अशा ठिकाणी 600 नवीन शाखा उघडणार आहोत. सध्या देशभरात आमच्या 22 हजारांहून अधिक शाखा आहेत. याशिवाय, SBI कडे 65,000 ATM आणि सुमारे 85,000 बिझनेस करस्पॉडंट्स देशाच्या विविध कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. भारतातील प्रत्येक घरात आमचा एक ग्राहक नक्कीच आहे."

SBI logo with a graphic indicating 10,000 job openings.
OLA CEO: 'कॉमेडियन बनू शकला नाही अन्...' ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल कुणाल कामरावर का भडकले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.