Why Nifty Crash: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. अहवालानुसार आतापर्यंत 26 लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबरच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या महिन्यात आतापर्यंत BSE सेन्सेक्स 5 टक्क्यांनी घसरला आहे. NSE निफ्टीचीही स्थिती अशीच आहे.
अशा स्थितीत बाजारातील घसरण अनेक गोष्टींचे संकेत देत आहे, तर दुसरीकडे गुंतवणूकदारांना काय करावे हे कळत नाही. या सगळ्यात ब्रोकरेज फर्म सीएलएसएच्या अहवालाने चिंतेत आणखी वाढ केली आहे.