Internship: क्या बात है! 'या' कंपनीत इंटर्नशिपसाठी मिळताहेत दरमहा 7.40 लाख रुपये; वाचा सविस्तर

एवढे पैसे मिळाले तर नोकरीची गरजच काय?
Internship
InternshipSakal
Updated on

Internship: इंटर्नशिप हा कामाचा अनुभव मिळवण्याचा आणि तुमचा रेझ्युमे वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ज्यामुळे तुम्ही तुमची स्वप्नवत नोकरी करू शकता. बर्‍याच कंपन्या त्यांच्या भर्ती प्रक्रियेचा भाग म्हणून इंटर्नशिप देतात.

कदाचित तुम्हीही तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात इंटर्नशीप केली असेल किंवा काहीजण आता इंटर्नशीप करण्याचा विचारही करत असतील. पण इंटर्नशिप दरम्यान चांगला स्टायपेंड मिळतोच असं नाही.

कारण बहुतांश इंटर्नशिप मोफत कराव्या लागतात. अनेक महिने इंटर्नशिप केल्यानंतर कुठेतरी नोकरी पक्की होते. तर काही कंपन्या त्यांच्या इंटर्नला स्टायपेंड देखील देतात.

ग्लोबल डिजिटल पेमेंट कंपनी स्ट्राइपने या वर्षी 40 तासांच्या कामाच्या आठवड्यावर आधारित इंटर्नशिप ऑफर केली आहे. 7.40 लाख सरासरी मासिक पगारासह ही इंटर्नशिप ऑफर केली आहे. याचा अर्थ एका इंटर्नला वर्षाला 81.72 लाख मिळतील, असे न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे.

Glassdoor, अमेरिकन वेबसाइटने 25-सर्वाधिक पैसे देणार्‍या इंटर्नशिपची यादी तयार केली आहे ज्यात Meta, Roblox, NVIDIA आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.

अहवालानुसार, गेल्या वर्षी सरासरी इंटर्नने प्रति तास 2,012 रुपये कमावले आहेत, जे 2021 च्या डेटापेक्षा 11 टक्क्यांनी वाढले आहेत. ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म रॉब्लॉक्सने दुसरे स्थान पटकावले असून त्याच्या इंटर्नचे मासिक सरासरी वेतन सुमारे 7.37 लाख आहे.

Internship
Jio vs Airtel: जिओच्या वादळात एअरटेलला कसं सावरलं? सुनील भारती मित्तल यांनी सांगितला फंडा...

अहवालानुसार, यादीतील निम्म्याहून अधिक इंटर्नशिप तंत्रज्ञान कंपन्यांच्या आहेत, ज्यांनी अलीकडेच कर्मचारी कपात केली आहे.

या इंटर्नशिपमध्ये मिळणाऱ्या पगारातून असे म्हणता येईल की एवढे पैसे मिळाले तर नोकरीची गरजच काय? विशेष म्हणजे कॉलेज किंवा विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप खूप महत्त्वाची असते. याद्वारे नोकरी मिळण्यापूर्वी एखादे क्षेत्र समजून घेण्याची संधी मिळते.

कॅपिटल वन फायनान्शियल कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी सारख्या फायनान्स कंपन्यांपासून ते मॅककिन्से अँड कंपनी आणि बेन अँड कंपनी सारख्या सल्लागार कंपन्यांपर्यंत चांगल्या पगाराच्या इंटर्नशिप मिळू शकतात.

Internship
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.