Success Story: नोकरीत मन रमत नव्हतं; 10x10 खोलीतून सुरू केला व्यवसाय, आज आहे करोडोंचा मालक

Success Story of Sidharth Oberoi: सिद्धार्थ एस ओबेरॉय हा अमेरिकेत प्रोजेक्ट इंजिनीअर होता. नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरु करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला. सिद्धार्थने LetsShave नावाची कंपनी सुरू केली.
Success Story of Sidharth Oberoi
Success Story of Sidharth OberoiSakal
Updated on

Success Story of Sidharth Oberoi: सिद्धार्थ एस ओबेरॉय हा अमेरिकेत प्रोजेक्ट इंजिनीअर होता. नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरु करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला. सिद्धार्थने LetsShave नावाची कंपनी सुरू केली. भारतात परतल्यावर त्याने डायमंड कोटींग रेझर ब्लेडवर काम करायला सुरुवात केली.

सुरुवातीला त्याला चंदिगडमधील अंबाला येथील एका छोट्या खोलीतून दरमहा केवळ 30 ते 40 ऑर्डर मिळायच्या. आज LetsShave ला दर महिन्याला 20,000 पेक्षा जास्त ऑर्डर मिळतात. Letshave आता 100 पेक्षा जास्त देशांमध्ये विस्तारला आहे. कंपनीने चार वर्षांत 6 लाख डॉलर उभे केले आहेत. विप्रो आणि कोरियन रेझर जायंट डोर्को यांसारख्या कंपन्यांनीही यात गुंतवणूक केली आहे.

2015 मध्ये कंपनीची सुरुवात केली

सिद्धार्थ ओबेरॉय मूळचा चंदिगडचा आहे. सिद्धार्थने चंदीगडच्या विवेक हायस्कूलमधून 11वी आणि 12वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इंजिनीअरिंगसाठी अमेरिकेला गेला. त्याने पर्ड्यू युनिव्हर्सिटी, सॅपिएन्झा युनिव्हर्सिटी ऑफ रोम आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधूनही शिक्षण घेतले.

सिद्धार्थने अमेरिकेतील प्रोजेक्ट इंजिनीअरचे काम सोडले आणि 2015 मध्ये लेटशेव्हची स्थापना केली. कंपनीला 2018 मध्ये Dorco आणि 2020 मध्ये विप्रो सारख्या मोठ्या कंपन्यांकडून गुंतवणूक मिळाली. लेट्सशेव्ह कंपनी उच्च दर्जाची शेव्हिंग उत्पादने विकते.

Success Story of Sidharth Oberoi
Jio Financial Services: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने लाँच केले JioFinance ॲप; ग्राहकांना मिळणार मोठ्या ऑफर्स
कंपनी स्थापन करण्याची कल्पना कशी सुचली?

सिद्धार्थला अमेरिकेतील त्याच्या युनिव्हर्सिटीच्या रूममध्ये या कंपनीची कल्पना सुचली. बाजारात इतर ग्रूमिंग उत्पादनांसाठी अनेक पर्याय होते. पण, शेव्हिंगसाठी मर्यादित पर्याय होते. तेव्हाच त्याने शेव्हिंग इंडस्ट्रीत काहीतरी वेगळं करायचं ठरवलं.

मात्र, त्यावेळी त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि नंतर त्याने प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याने आपली कल्पना काही कंपन्यांनाही सांगितली.

दोन वर्षे उलटली आणि सिद्धार्थने अमेरिकेत प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून नोकरी सुरू ठेवली. एके दिवशी त्याला कळले की एका कोरियन कंपनीने त्याच्यासोबत भागीदारी करण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर त्याने नोकरी सोडली आणि लेटशेव्ह सुरू करण्यासाठी 2015 मध्ये भारतात परतला.

Success Story of Sidharth Oberoi
Gold Price Today: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची सुवर्णसंधी; सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण
एका छोट्या खोलीतून कंपनीची सुरुवात

सिद्धार्थ ओबेरॉयने अंबाला येथील एका छोट्याशा 10x10 खोलीतून लेटशेव्ह कंपनी सुरु केली. सुरुवातीला त्याला महिन्याला फक्त 30 ते 40 ऑर्डर मिळायच्या. सुरुवातीचे महिने निराशाजनक होते कारण त्याला महिन्याला जेमतेम एक लाख रुपये मिळत होते. आता कंपनीला दरमहा सुमारे 3 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्याला 20,000 हून अधिक ऑर्डर मिळतात.

आज कंपनीचा व्यवसाय 100 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. विप्रो आणि कोरियन कंपनी डोर्को यांसारख्या बड्या कंपन्यांनीही कंपनीत गुंतवणूक केली आहे. मात्र, 70 टक्के हिस्सा अजूनही सिद्धार्थकडेच आहे. कंपनीची किंमत 54 कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.