Success Story Raj Patel: फार कमी लोकांना माहिती असेल की भारतातील गुजरातमधील एक व्यक्ती वाईन बनवण्यासाठी अमेरिकेत फेमस आहे. त्यांनी केवळ अमेरिकेतच नाही तर जगात वाईनचा ब्रँड फेमस केला आहे. आज ही वाईन जगभरात लोकप्रिय होत आहे.
ही वाईन आणि वाईनचा ब्रँड बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे राज पटेल. ते चर्चेत कसे आले त्याचा एक खास किस्सा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये खास जेवण ठेवण्यात आले होते.
याशिवाय जेवणात पाहुण्यांना 'पटेल रेड ब्लेंड 2019' नावाची वाईनही दिली गेली. ही वाईन गुजरातमधून अमेरिकेत स्थायिक झालेल्या राज पटेल यांनी बनवली होती. राज पटेल 1972 मध्ये अमेरिकेत कामासाठी गेले होते. त्यांनी सांगितले की ते अमेरिकेतील पहिले पटेल कुटुंब होते.
वाईन बनवण्याची प्रेरणा कशी मिळाली?
इंडिया टुडेच्या मुलाखतीत राज पटेलांनी सांगितले की, जेव्हा ते रॉबर्ट मांडवी वाईनरीमध्ये इंटर्नशिप करत होते, तेव्हा त्यांची भेट रॉबर्ट मांडवी यांच्याशी झाली. त्यांनीच राज पटेल यांना वाईनचा व्यवसाय कर, असे सांगितले.
तेव्हापासून राज पटेल यांनी वाईनचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 2007 मध्ये त्यांनी पहिली विंटेज वाईन बनवली. सुरुवातीला पटेल वाईन्सने 100 वाईन तयार केल्या. आजपर्यंत त्यांच्या वाईनरीने 1,200 वाईन तयार करत आहे.
राज पटेल यांना दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता असलेली वाईन बनवायची होती. त्यांनी सांगितले की त्यांनी अमेरिकन लोकांच्या चवीनुसार वाईन बनवली होती, पण काही वर्षांत भारतीयांनीही अमेरिकन लोकांसाठी बनवलेली वाईन स्वीकारली.
जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये वाइन सर्व्ह केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा त्यांची वाईन सर्व्ह करण्यात आली तेव्हा राज पटेल म्हणाले की, रात्रीच्या जेवणात रेड ब्लेंड 2019 नावाची वाईन सर्व्ह करण्यात आली होती. ते म्हणाले की, आमचे ध्येय आहे की प्रत्येकाला आमच्या वाईनची चव घेता आली पाहिजे.
यामुळे आमच्या वाईनचे आकर्षण वाढते. त्यामुळे मला व्हाईट हाऊसमध्ये वाईन सर्व्ह करण्याची संधी मिळाली. त्यांनी सांगितले की त्यांची रेड वाईन सर्व प्रकारच्या पदार्थांसोबत घेतली जाऊ शकते.
भारतात वाईन निर्यात करणार का?
भारतातील लोकांना या वाईनची चव कधी घेता येईल यावर त्यांनी उत्तर दिले की, काही देशांमध्ये वाईन निर्यात करणे कठीण आहे. या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.
त्यांनी सांगितले की भारतात वाईन निर्यात करणे महाग आहे. राज पटेल यांनी सांगितले की ते आपली वाईन जपान, तैवान, यूके सारख्या देशांमध्ये निर्यात करतात.
वाईनची किंमत किती आहे?
कंपनीच्या वेबसाइटनुसार, रेड वाईनच्या बाटलीची किंमत 75 डॉलर आहे. भारतीय रुपयात वाईन किंमत 6,100 रुपयांपेक्षा जास्त आहे. जरी वाईन मार्केटमध्ये फ्रेंच आणि इटालियन ब्रँडचे वर्चस्व असले तरी व्हाईट हाऊसने पटेल वाईनची ऑर्डर दिल्यावर ही कंपनी प्रसिद्धीच्या झोतात आली.
राज पटेल यांनी केले पीएम मोदींचे कौतुक
राज पटेल यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना म्हणाले की, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान मोदी भारतात चांगले काम करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.