Success Story: विमान वाहतूक उद्योग हा पुरुषांचे वर्चस्व असलेला उद्योग असल्याचे म्हटले जाते. पण दिल्लीतील कनिका टेकरीवालने या इंडस्ट्रीत केवळ पाऊल ठेवले नाही तर यशही मिळवले आहे.
वयाच्या 21 व्या वर्षी कर्करोगाचे निदान झालेल्या कनिकाने या आजारावर मात करून भारतातील सर्वात मोठी खासगी जेट कंपनी स्थापन केली. या कंपनीचे नाव आहे JetSetGo.
JetsetGo काय करते?
कनिका टेकरीवाल या जेटसेटगोच्या सीईओ आणि संस्थापक आहेत. जेटसेटगो ही दिल्ली स्थित खाजगी जेट सेवा कंपनी आहे. कंपनी ही एक प्लेन एग्रीगेटर आहे जी लोकांना खाजगी जेट आणि हेलिकॉप्टर भाड्याने देते. कनिकाला भारत सरकारकडून ईकॉमर्ससाठी राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारही मिळाला आहे.
2011 मध्ये जेव्हा कनिका 21 वर्षांची होती तेव्हा तिला कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तिच्यावर 9 महिने उपचार केले गेले, त्यानंतर ती बरी झाली.
कर्करोगावर मात केल्यानंतर, कनिकाने 2014 मध्ये JetSetGo सुरू केले. कनिकाला वयाच्या 16 व्या वर्षापासून विमान चालवण्याची आवड होती. कनिका ही एमबीए पदवीधर आहे. कनिका JetsetGo ला 'उबर ऑफ द स्काय' देखील म्हणते.
कनिका टेकरीवालचा जन्म भोपाळमध्ये झाला असून ती मारवाडी कुटुंबातील आहे. कनिका टेकरीवालने तिचे शालेय शिक्षण लॉरेन्स स्कूल, लव्हडेलमधून पूर्ण केले आणि भोपाळच्या जवाहरलाल नेहरू वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातही शिक्षण घेतले.
कनिकाने कोव्हेंट्री विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. भारतातील चार्टर प्लेन क्षेत्राचा कायापालट करण्याचे सर्व श्रेय कनिका टेकरीवाला जाते.
गुंतवणूकदारांमध्ये क्रिकेटर युवराज सिंगचाही समावेश आहे.
आज कनिकाच्या जेटसेटगो या कंपनीची उलाढाल 150 कोटी रुपये आहे.जेटसेटगोच्या गुंतवणूकदारांमध्ये सिमेंट उद्योगपती पुनीत दालमिया आणि क्रिकेटर युवराज सिंग यांचा समावेश आहे.
आता तिच्याकडे 10 खाजगी जेट आहेत. कनिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे तीची एकूण संपत्ती 420 कोटी रुपये आहे.
कंपनी सुरू करण्याचे कारण काय होते?
कनिकाला भारताच्या विमान उद्योगात खाजगी जेट स्पेसमध्ये एग्रीगेटरची गरज जाणवली. कनिका अनेक लोकांना भेटली ज्यांनी सांगितले की भारतात खाजगी जेट बुकिंगचा वाईट अनुभव वाईट आहे.
तसेच, अनेक खाजगी जेट मालक होते जे वाढत्या किंमती, नियमित देखभाल आणि इतर समस्यांमुळे त्यांची विमाने विकत होते. दरम्यान, यूकेमधील एका सहकाऱ्यासोबत गप्पा मारत असताना कनिकाला जेटसेटगोची कल्पना सुचली.
रिटेल आणि ई-कॉमर्सच्या बाबतीत कनिका टेकरीवालला फोर्ब्सच्या 2016 च्या यादीत स्थान दिले होते. कनिकाला कोटक वेल्थ हुरून- लीडिंग वेल्थी वुमन, 2020 च्या यादीतही स्थान मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.