Success Story: UPSC ची तयारी सोडून टाकले चहाचे दुकान, मित्राने केली मदत, आज वर्षाला कमावतोय 150 कोटी

वडीलांनी यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवले होते.
Success Story
Success StorySakal
Updated on

Success Story: जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. अनुभव दुबे वय फक्त 28 वर्ष, जो एकेकाळी UPSC चा अभ्यास करत होता त्याने ही म्हण खरी ठरवली आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्याने आपला मित्र आनंद नायक सोबत प्रसिद्ध 'चाय सुट्टा बार'ची स्थापन केली होती.

अनुभवचे वडील व्यापारी होते. पण आपल्या मुलाने उद्योगपती व्हावे अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अनुभवला यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवले. मात्र, त्याच्या मनात फक्त व्यवसाय सुरू करण्याचेच ध्येय होते. या व्यवसायात त्याला त्याचा शाळेचा मित्र आनंद नायक याने साथ दिली.

आनंद घरीही कपड्यांचा व्यवसाय चालायचा. पण तो थांबला. अनुभवला कोणता व्यवसाय करायचा आहे हे आनंदला माहीत होते. एके दिवशी फोनवर बोलत असताना आनंदने अनुभवला सांगितले की, जुना व्यवसाय बंद झाला असून आता ते दोघे मिळून काहीतरी नवीन करू शकतात.

अनुभवने आई-वडिलांना न सांगता इंदूर गाठले. व्यवसाय सुरू करण्यासाठी दोघांची एकूण 3 लाख रुपयांची बचत होती. अनुभवच्या मनात चहाचे दुकान उघडण्याचा विचार आला. भारतात चहाला खूप पसंती आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगले पैसे मिळतात.

मुलींच्या वसतिगृहाजवळ दुकान सुरू केले:

त्यांनी भंवरकुआन येथील मुलींच्या वसतिगृहासमोर चाय सुट्टा बार सुरू केला. या भागात अनेक कोचिंग सेंटर्स होती. म्हणूनच चहाच्या दुकानासाठी ते एक प्रमुख ठिकाण होते.

मात्र, असे असतानाही पहिल्या दिवशी फारच कमी लोक त्यांच्या दुकानात आले. असे आणखी काही दिवस चालले. यावेळीही त्याच्या मदतीसाठी मित्रच पुढे आले.

दुकानात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी असताना अनुभवने त्याच्या मित्रांची मदत घेतली. त्याने आपल्या मित्रांना दुकानात बोलावून बनावट जमाव जमवला. तो त्यांना फुकट खाण्यापिण्याची सोय करत असे.

Success Story
RBI: रिझर्व्ह बँकने सुरू केली '100 डेज 100 पे' विशेष मोहीम, प्रत्येक बँकेतील हक्क नसलेल्या ठेवींचा होणार...

मात्र दुकानात सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकांची वर्दळ सुरूच होती. गर्दी पाहून हळुहळू बाहेरचे लोकही दुकानाकडे आकर्षित होऊ लागले.

इतकेच नाही तर अनुभवचे मित्र अनेक गर्दीच्या ठिकाणी चाय सुत्ता बारचे नाव घेऊन लोकांना सांगायचे. त्यामुळे लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. अशा प्रकारे चाय सुत्ता बारचा व्यवसाय सुरू झाला.

देशातच नाही तर परदेशातही चहाचा डंका:

अनुभव आणि आनंद यांनी 6 महिन्यांत 2 राज्यांमध्ये चाय सुट्टा बारच्या 4 फ्रँचायझी विकल्या. सध्या त्यांची देशात 150 आउटलेट आहेत. या कंपनीची फ्रँचायझी देशातच नाही तर परदेशातही सुरू होत आहे.

चाय सुत्ता बार दुबई, यूके, कॅनडा आणि ओमान सारख्या देशांमध्ये पोहोचला आहे. अहवालानुसार आज कंपनी दरवर्षी 100-150 कोटी रुपयांची विक्री करते.

Success Story
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()