Success Story: एकेकाळच्या वेटर आज चालवतायत 2 लाख कोटींची कंपनी, असा आहे भारतीय वंशाच्या CEOचा प्रवास

देशातील एका छोट्या शहरातून सुरु केलेला प्रवास अमेरिकेत पोहोचला.
Success Story
Success StorySakal
Updated on

Success Story: सुंदर पिचाई, सत्या नडेला, पराग अग्रवाल, थॉमस कुरियन आणि भारतापासून अमेरिकेपर्यंतच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक सीईओंनी जगभरात आळख निर्माण केली आहे.

ही नावे बरीच प्रसिद्ध आहेत आणि चर्चेतही आहेत, पण अशी काही नावे आहेत ज्यांची दखल घेतली जात नाही. यामिनी रंगनने देशातील एका छोट्या शहरातून सुरु केलेला प्रवास अमेरिकेत पोहोचला.

यामिनी रंगन यांचे नाव तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित सीईओ म्हणून घेतले जाते. यामिनी अमेरिकेमध्ये 25.66 अब्ज डॉलर म्हणजेच 2 लाख कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत.

त्या भारतातील विकसक आणि सॉफ्टवेअर फर्म HubSpot च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी अमेरिकेत पोहोचलेल्या यामिनी यांच्या यशाचा हा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया.

मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी वयाच्या 21व्या वर्षी यामिनी भारतातील एका छोट्या गावातून अमेरिकेत गेल्या. मात्र, यशाचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता.

यामिनी रंगनला करिअरच्या सुरुवातीच्या काळात संघर्षाचा सामना करावा लागला. महिनाभर अमेरिकेत राहण्याचा प्रयत्न करत असताना, यामिनीचे भाडे भरल्यानंतर तिच्या खिशात फक्त 150 डॉलर शिल्लक राहायचे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना कामाची गरज होती.

डीएनए रिपोर्टनुसार, यामिनी यांनी तिची पहिली नोकरी अटलांटामधील फुटबॉल स्टेडियममध्ये केली, जिथे त्यांनी रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम केले.

यामिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना नेहमीच स्वतंत्र राहायचे होते आणि घरी परत जायचे नव्हते किंवा पालकांकडून पैसेही मागायचे नव्हते.

Success Story
Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केला थरारक व्हिडिओ, फोटोग्राफर समोर उभारला सिंह अन्...

भारतात शिक्षण:

यामिनी रंगन यांनी भारथियार युनिव्हर्सिटी, कोईम्बतूर येथून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यापूर्वी बर्कले येथून एमबीए केले.

त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत, त्यांनी SAP, Lucent, Workday आणि Dropbox सारख्या IT कंपन्यांसाबत काम केले. 2020 मध्ये, त्या HubSpot मध्ये मुख्य ग्राहक कार्यकारी म्हणून रुजू झाल्या.

एका वर्षाच्या आत, त्यांना 2021 मध्ये CEO पदावर पदोन्नती मिळाली आणि यामिनी रंगन ओरावलेच्या सफारा कॅटझ, अरिस्ताच्या जयश्री उल्लाल आणि HCL च्या रोशनी नाडर यांच्या सारख्या महिला CEO च्या यादीत सामील झाल्या.

त्यांनी 2019 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील व्यवसायातील सर्वात प्रभावशाली महिला यासारखे अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

Success Story
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()