Tilak Mehta News Marathi|Success Story Marathi
Tilak Mehta News Marathi|Success Story MarathiSakal

Success Story: शाब्बास रे पठ्ठ्या! शाळेत जाण्याच्या वयात सुरू केली कंपनी, आज आहे 100 कोटींचा मालक

Success Story: व्यवसायाची कल्पना कशी सुचली?
Published on

Success Story: वयाच्या 13 व्या वर्षी मुले शाळेत जातात, पण एक मुलगा असा आहे ज्याने लहान वयात आपल्या मेहनतीने 100 कोटींची कंपनी उभी केली आहे. यावर विश्वास ठेवणे अनेकांना कठीण जाईल, पण हे खरे आहे. ही गोष्ट आहे मुंबईच्या टिळक मेहताची.

टिळक मेहताने अभ्यासासोबतच व्यवसाय सुरू केला आणि 2 वर्षात तो यशस्वी उद्योजक बनला. शाळेत जाण्याच्या तरुण वयात टिळक 200 हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. चला जाणून घेऊया त्याची यशोगाथा.

व्यवसायाची कल्पना कशी सुचली?

गुजरातमध्ये 2006 मध्ये जन्मलेल्या टिळक मेहताने वयाच्या 13 व्या वर्षी कंपनी सुरू केली. लहानपणीच्या एका घटनेने त्याला व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली.

ऑफिसमधून परतल्यावर, टिळक मेहताचे वडिल त्याला बाजारातून स्टेशनरीच्या वस्तू आणायला सांगायचे तेव्हा त्याला खूप कंटाळा यायचा. अशा परिस्थितीत पुस्तकांच्या होम डिलिव्हरीची कल्पना टिळक मेहताला सुचली.

Tilak Mehta News Marathi|Success Story Marathi
Loan Rates: महागाईचा झटका! देशातील 'या' 3 सरकारी बँकांनी व्याजदरात केली वाढ, तुमचे कर्ज होणार महाग

यानंतर त्याने हा बिझनेस प्लॅन वडिलांसोबत शेअर केला. वडिलांनी टिळकला सुरुवातीला बिझनेस सुरु करण्यासाठी पैसे दिले आणि त्याला बँक अधिकारी घनश्याम पारेख यांना भेटायला लावले. दोघांनी मिळून पेपर एन पार्सल नावाची कुरिअर सेवा सुरू केली आणि घनश्याम पारेख कंपनीचे सीईओ बनले.

Tilak Mehta News Marathi|Success Story Marathi
Bank of Baroda Loan: बँक ऑफ बडोदाने कर्जासंबंधी घेतला मोठा निर्णय; करोडो ग्राहकांना बसणार फटका

कंपनी काय करते?

पेपर्स एन पार्सल हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जे शिपिंग आणि लॉजिस्टिकशी संबंधित सेवा पुरवते. यासाठी कंपनीकडे मोठी टीम आहे. ही कंपनी आपल्या मोबाईल अॅपद्वारे लोकांना घरोघरी सेवा पुरवते.

त्यांच्या कंपनीसोबत 200 कर्मचारी आणि 300 हून अधिक डब्बेवाले जोडले गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कंपनी दररोज हजारो पार्सल वितरित करते आणि त्यासाठी 40 ते 180 रुपये आकारते.

Tilak Mehta News Marathi|Success Story Marathi
RBI रेपो रेटच्या निर्णयानंतर गृहखरेदीवर कसा होणार परिणाम? काय म्हणतात तज्ज्ञ?

TOI च्या रिपोर्टनुसार, टिळक मेहताच्या कंपनीला इतके मोठे यश मिळाले की तिची उलाढाल 100 कोटी रुपयांवर पोहोचली. 2021 मध्ये टिळक मेहताची एकूण संपत्ती 65 कोटी रुपये होती, तर मासिक वेतन 2 कोटी रुपये होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()