Sukanya Samriddhi Yojana: ...नाहीतर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते होईल बंद, लवकर करा हे महत्त्वाचे काम!

Sukanya Samriddhi Yojana: तुमचे खाते कधी बंद केले जाईल?
Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi YojanaSakal
Updated on

Sukanya Samriddhi Yojana: महिलांसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड सर्व बचत योजनांना अनिवार्य करण्यात आले आहे.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), महिला सन्मान योजना यांसारख्या कोणत्याही योजनेत योजनाधारकाचे खाते पॅनकार्ड आणि आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर ते या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही.

जर तुमचे सुकन्या योजनेचे खाते असेल आणि तुम्ही तुमचे खाते पॅन आणि आधारशी लिंक केले नाही तर तुमचे खाते बंद केले जाईल. जर तुमचे खाते बंद केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ पुन्हा मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत खातेधारकाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

Sukanya Samriddhi Yojana
ITR Filing 2023: आयकर विभाग देत आहे मोफत ITR भरण्याची सुविधा, अशी आहे संपूर्ण प्रोसेस

सुकन्या समृद्धी योजना काय आहे?

केंद्र सरकारने मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. ही योजना पूर्णपणे सरकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश देशातील मुली आणि महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे.

या योजनेमुळे मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. या योजनेत योजनाधारकाला 8 टक्के व्याज मिळते. या योजनेत जमा केलेली रक्कम 2 वर्षांनी मॅच्युअर होते.

Sukanya Samriddhi Yojana
GST: हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका! आता भरावा लागणार 12 टक्के GST

तुमचे खाते कधी बंद केले जाईल

एका अधिसूचनेनुसार, वित्त मंत्रालयाने सर्व लहान बचत योजनांसाठी Know Your Customer (KYC) अनिवार्य केले आहे. योजना धारकाने पॅन कार्ड देणे किंवा फॉर्म 60 भरणे आवश्यक आहे.

खाते उघडताना तुम्ही पॅनकार्ड जमा केले नसेल, तर तुम्हाला दोन महिन्यांत आधार कार्ड सादर करावे लागेल. जर तुम्ही 31 मार्च 2023 नंतर खाते उघडले असेल तर आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.