Government Scheme: 'या' सरकारी योजनेत 'एवढी' गुंतवणूक करा, वयाच्या 21व्या वर्षी मुलीला मिळतील 65 लाख

या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात.
sukanya samriddhi yojana
sukanya samriddhi yojanaSakal
Updated on

Sukanya Samriddhi Scheme: केंद्र सरकार मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवत आहे. या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात. सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन योजना आहे.

यामध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जोडू शकतात. अलीकडेच सरकारने या योजनेच्या व्याजदरातही वाढ केली आहे. चालू तिमाहीसाठी सरकारने व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के केला आहे.

किती गुंतवणूक करता येईल?

सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षांसाठी आहे. परंतु पालकांना सुरुवातीच्या 15 वर्षांसाठीच पैसे जमा करावे लागतील. पैसे जमा न करता खाते सहा वर्षे चालू राहते. (Sukanya Samriddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 10 वर्षांखालील मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावरच उघडले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही वार्षिक 250 ते 1.50 लाख रुपये जमा करू शकता.

sukanya samriddhi yojana
Dividend stocks: गुंतवणूकदारांची होणार चांदी; 'या' आठवड्यात 6 कंपन्याची एक्स-डिव्हिडंड डेट, जाणून घ्या

खाते कसे उघडायचे?

यापूर्वी, या योजनेत 80C अंतर्गत केवळ दोन मुलींच्या खात्यावर कर सूट उपलब्ध होती. मात्र काही महिन्यांपूर्वी या योजनेचे नियम बदलण्यात आले असून आता एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांच्या खात्यावरही करात सूट दिली जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजना खात्यातील गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा बँकेद्वारे स्वीकारल्या जाणार्‍या इतर कोणत्याही प्रकारे जमा केली जाऊ शकते.

ही योजना 21 वर्षात मॅच्युअर होते :

सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात मॅच्युअर होते. मात्र, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर या खात्यातून शिक्षणासाठी रक्कम काढता येईल. संपूर्ण रक्कम 21 वर्षांनंतरच काढता येईल.

फेब्रुवारी 2023 पर्यंत या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 3 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. 2015 मध्ये, मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. तुम्ही या योजनेत फक्त 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

sukanya samriddhi yojana
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अशा प्रकारे तुम्हाला 65 लाख रुपये मिळतील :

जर एखाद्या पालकाने मुलीच्या जन्मापासून दरमहा 12,500 रुपये गुंतवले तर एका वर्षात त्यांच्याकडे 1,50,000 लाख रुपये जमा होतील. अशा प्रकारे तो 15 वर्षात 22,50,000 रुपयांची गुंतवणूक करेल.

आता 7.6 टक्के जुन्या दरावर नजर टाकली तर 43,43,071 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशाप्रकारे, योजना मॅच्युअर होईपर्यंत मुलीसाठी 65,93,071 रुपये जमा करेल.

मॅच्युअर मूल्य

65,93,071 रुपये

निव्वळ व्याज

43,43,071 रुपये

एकूण गुंतवणूक

22,50,000 रुपये

मॅच्युअर वर्ष

2044

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.