बँकेत खाते नसताना रामदेव बाबांना 'पतंजली'साठी कर्ज आणि बेट गिफ्ट देणाऱ्या सुनीता पोद्दार आहेत तरी कोण?

बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी 2006 मध्ये त्यांची कंपनी सुरू केली तेव्हा त्यांना मोठे कर्ज मिळाले होते.
baba ramdev
baba ramdevSakal
Updated on

Sunita Poddar: बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी 2006 मध्ये त्यांची कंपनी सुरू केली तेव्हा त्यांना मोठे कर्ज मिळाले होते. त्यावेळी त्यांचे बँकेत खातेही नव्हते. त्यांना त्यांची अनुयायी सुनीता आणि सरवन सॅम पोद्दार यांच्याकडून कर्ज मिळाले.

2011 च्या इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, सरवन 'सॅम' पोद्दार आणि त्यांची पत्नी सुनीता हे स्कॉटलंडचे रहिवासी आहेत. पतंजली योग पीठ (UK) ट्रस्टच्या माहितीनुसार, त्यांनी लिटल कुंब्रे नावाचे एक बेट 20 लाख पौंडमध्ये विकत घेतले आणि 2009 मध्ये बाबा रामदेव यांना भेट म्हणून दिले.

2011 मध्ये, त्यांच्याकडे कंपनीचे प्रत्येकी 12.46 लाख शेयर्स होते. तर 2011 मध्ये त्यांची कंपनीत 7.2 टक्के हिस्सेदारी होती. आचार्य बालकृष्ण यांच्यानंतर पतंजली आयुर्वेदातील ते दुसरे सर्वात मोठे स्टेकहोल्डर होते.

ज्यांचे कंपनीत 92 टक्क्यांहून अधिक शेअर्स होते. सध्या कंपनीत त्यांची हिस्सेदारी आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीने गेल्या आर्थिक वर्षात 886.44 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. फोर्ब्सनुसार, आचार्य बालकृष्ण यांची एकूण संपत्ती 29,680 कोटी रुपये आहे. कंपनीची उलाढाल 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

रामदेव यांच्या योगासनांचा सुनीता यांना उपयोग झाला. त्यांचे वजन खूप कमी झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पतीला हे बेट दान करण्यासाठी राजी केले. सुनीता यूकेच्या पतंजली पीठ ट्रस्टच्या विश्वस्त बनल्या होत्या.

सुनीता पोद्दार आणि सरवन पोद्दार
सुनीता पोद्दार आणि सरवन पोद्दारSakal

सुनीता ग्लासगोमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक

सुनीता ग्लासगोमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. त्या योगा क्लासेस देखील घेतात. त्या योगा शिक्षकांना प्रशिक्षणही देतात. सुनीता गॅस स्टेशन चालवायच्या. त्या पतीच्या व्यवसायामध्ये काम करु लागल्या. व्यवसाय यशस्वी झाला.

रामदेव यांनी एकदा सांगितले होते की 1995 मध्ये त्यांच्याकडे दिव्या फार्मसीची नोंदणी करण्यासाठीही पैसे नव्हते. तेव्हा ते फक्त योग शिक्षक होते.

baba ramdev
RBI: RBI ने 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या बातमीवर दिले स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

गोविंद अग्रवाल नावाच्या व्यक्तीनेही केली मदत

रामदेव यांना लोकप्रियता मिळाल्यावर त्यांनी कंपनीचा विस्तार करून जनतेपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सरवन आणि सुनीता पोद्दार यांनी त्यांना कर्ज दिले होते.

गोविंद अग्रवाल नावाच्या व्यक्तीनेही त्यांना मदत केली. सुनीता या Oakminster Healthcare च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक आहेत.

baba ramdev
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.