Taj Hotel: टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलबद्दल तुम्हाला माहिती असेलच. या समूहाचे पहिले हॉटेल 1903 मध्ये मुंबईत सुरू झाले. एका खोलीचे रात्रीचे भाडे 6 रुपये होते. ताज हॉटेल चालवणारी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) चे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
या मार्केट कॅपला स्पर्श करणारी ही पहिली भारतीय हॉस्पिटॅलिटी कंपनी ठरली आहे. या क्षेत्रातील ओबेरॉय हॉटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे. ओबेरॉय हॉटेल्सची मूळ कंपनी EIH चे मार्केट कॅप सुमारे 24,000 कोटी रुपये आहे.