Tata Group: टाटा समूह 70 वर्षे जुनी कंपनी विकणार? गुंतवणूकदारांमध्ये नाराजी, शेअर्समध्ये मोठी घसरण

Tata Group: टाटा समूह व्होल्टास लिमिटेडचे होम अप्लायन्स व्यवसाय विकण्याचा विचार करत आहे
Tata considering sale of Voltas home appliance business
Tata considering sale of Voltas home appliance business Sakal
Updated on

Tata Group: टाटा समूह व्होल्टास लिमिटेडचे होम अप्लायन्स व्यवसाय विकण्याचा विचार करत आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत व्यवसायाचा विस्तार करण्याच्या आव्हानांमुळे टाटा समूह व्होल्टास लिमिटेडच्या व्यवसायाची विक्री करण्याचा विचार करत आहे, ब्लूमबर्गच्या अहवालात एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रीची चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. टाटा समूहही आपला विचार बदलू शकतो. त्याचवेळी टाटा समूहाच्या प्रतिनिधीने या अहवालावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Tata considering sale of Voltas home appliance business
WeWork Bankruptcy: अमेरिकन कंपनी WeWorkने केली दिवाळखोरीची घोषणा; काय आहे कारण?

1954 मध्ये कंपनीची स्थापना झाली, व्होल्टास एअर कंडिशनर, वॉटर कूलर आणि घरगुती उपकरणे यांमध्ये व्यवहार करते. कंपनी भारत, मध्य पूर्व, दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिकेत कार्यरत आहे.

कंपनीचे शेअर्स या वर्षी सुमारे 3 टक्क्यांनी वाढले आहेत, ज्यामुळे त्याचे बाजार मूल्य सुमारे 3.3 अब्ज डॉलर झाले आहे. वोल्टास भारतात टाटा समूहातर्फे त्यांच्या संयुक्त उपक्रम Arcelik AS द्वारे चालवले जात आहे.

Tata considering sale of Voltas home appliance business
Citigroup: सिटीग्रुपचा आणखी 10 टक्के नोकर कपातीचा प्लॅन; यापूर्वी 2,000 कर्मचाऱ्यांना दिला होता नारळ

30 सप्टेंबरपर्यंत, व्होल्टासचा भारतातील बाजारातील हिस्सा रेफ्रिजरेटर्ससाठी 3.3 टक्के आणि वॉशिंग मशीनसाठी 5.4 टक्के होता.

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री झाली. व्यवहारादरम्यान शेअर 2 टक्क्यांनी घसरून 812 रुपयांवर आला. व्होल्टासचे मार्केट कॅप सुमारे 27 हजार कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.