Tata-Haldiram Deal: टाटा समूहाने हल्दीराममधील 51 टक्के स्टेक खरेदीचे वृत्त फेटाळले, कंपनीने सांगितलं...

Tata-Haldiram Deal: : टाटा समूहाने या वृत्ताचे खंडन केले आहे.
Tata-Haldiram Deal
Tata-Haldiram DealSakal
Updated on

Tata-Haldiram Deal: टाटा समूहाने या वृत्ताचे खंडन केले की समूहाने हल्दीरामशी किमान 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याची बोलणी चालू आहे. स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने सांगितले की, मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केल्याप्रमाणे कंपनीशी कोणतीही चर्चा होत नाही.

अलीकडेच एका मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की भारतीय स्नॅक्स कंपनी हल्दीराम आता विकण्यासाठी तयार आहे आणि टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी ते खरेदी करू शकते.

आता हल्दीराम यांनी टाटा समूहाच्या कंपनीला 51 टक्के स्टेक विकल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. कंपनीने सांगितले की, ती अशी कोणतीही चर्चा करत नाही.

टाटा आणि हल्दीराम यांच्यात चर्चा सुरू असल्याचा दावा रॉयटर्सच्या वृत्तात करण्यात आला आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स हल्दीराममधील किमान 51 टक्के स्टेक खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. मात्र, यात सर्वात मोठा अडथळा आहे तो हल्दीरामच्या मूल्यांकनाचा. हल्दीराम यासाठी 1 हजार कोटी डॉलर्सचे मूल्यांकन करत आहे, यामुळे टाटा समूह सहमत नाही.

Tata-Haldiram Deal
‘फिनटेक’ने स्वनियामक यंत्रणा उभारावी - शक्तिकांत दास

हल्दीरामची प्रायव्हेट इक्विटी फर्मशीही बोलणी सुरू

अहवालात असे सांगण्यात आले की हल्दीराम त्याच्या 10 टक्के भागविक्रीसाठी बेन कॅपिटलसह काही खाजगी इक्विटी कंपन्यांशी बोलणी करत आहे. या प्रकरणी टाटा कंझ्युमरच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याचवेळी हल्दीरामचे सीईओ कृष्ण कुमार चुटानी आणि खासगी इक्विटी फर्म बेन कॅपिटल यांनीही याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला

Tata-Haldiram Deal
G20 Summit 2023: मुकेश अंबानी ते गौतम अदानी, देशातील हे टॉप 500 उद्योगपती G20 मध्ये होणार सहभागी

देशात 150 हून अधिक रेस्टॉरंट्स

युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या मते, भारतातील स्नॅक्स मार्केटची किंमत सुमारे 6.2 अब्ज डॉलर आहे आणि हल्दीरामचा या मार्केटमध्ये सुमारे 13 टक्के वाटा आहे. याशिवाय पेप्सीचाही या मार्केटमध्ये दबदबा आहे आणि त्याच्या Lays चिप्सचा केवळ 12 टक्के वाटा आहे.

हल्दीरामच्या उत्पादनांना केवळ भारतातच नाही तर सिंगापूर आणि यूएसए सारख्या परदेशी बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. कंपनीचे जवळपास 150 रेस्टॉरंट आहेत जे स्थानिक खाद्यपदार्थ आणि मिठाई विकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com