Tata Elxsi Share Price: टाटा एलेक्सी लिमिटेडच्या शेअर्सचे करायचे काय? विकायचे की ठेवायचे? एक्सपर्ट्स म्हणतात...

Tata Elxsi Share Price: टाटा एलेक्सीचे शेअर्स गेल्या 6 महिन्यात 8 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, या वर्षी आतापर्यंत हा शेअर सुमारे 6 टक्क्यांनी घसरला आहे.
Tata Elxsi Share Price
Tata Elxsi Share PriceEsakal
Updated on

टाटा एलेक्सी लिमिटेडच्या (Tata Elxsi Limited) शेअर्समध्ये सध्या जोरदार प्रॉफीट बुकिंग सुरु आहे. हा शेअर बीएसईवर 7.60 टक्क्यांनी घसरून सध्या 8288.85 रुपयांवर व्यवहार करत आहे.

याआधी गेल्या दोन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्क्यांची तगडी तेजी पाहायला मिळाली. दुसरीकडे, ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजला स्टॉकमध्ये आता घसरण अपेक्षित आहे.

या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 51,548 कोटीवर आले. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 9,191.10 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 6,406.60 रुपये आहे.

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने टाटा एल्क्सी शेअर्सना सेल अर्थात विक्री रेटिंग दिले आहे आणि 5500 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

सध्याच्या किमतीनुसार कंपनीच्या शेअर्समध्ये 33 टक्के घट होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेजने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे की मागील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये पाहिल्या गेलेल्या हालचालींपूर्वीच शेअर महागड्या मूल्यांवर व्यवहार करत होता.

पण कंपनीला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ब्रोकरेजने लिहिले की मीडिया आणि कम्युनिकेशन व्हर्टिकलमध्ये खर्च कमजोर राहतो, पण कंपनीच्या हेल्थकेअर व्हर्टिकलमध्ये मोठ्या क्लायंटद्वारे रिन्यूअलला वेळ लागत आहे.

टाटा एलेक्सीचे शेअर्स गेल्या 6 महिन्यात 8 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, या वर्षी आतापर्यंत हा शेअर सुमारे 6 टक्क्यांनी घसरला आहे.

गेल्या वर्षभरात केवळ 11 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 1200 टक्के परतावा मिळाला आहे. टाटा एलेक्सी कव्हर करणाऱ्या 12 विश्लेषकांपैकी फक्त दोघांनी स्टॉकवर 'बाय' शिफारस केली आहे, एकाने 'होल्ड' रेटिंग दिले आहे, तर इतर नऊ जणांना स्टॉकवर 'सेल' रेटिंग दिले आहे.

Tata Elxsi Share Price
भारतीय क्रिकेटमध्ये Reliance चे राज्य! डिज्नी स्टार अन् Viacom 18 ची डील पक्की, CCI चा ग्रीन सिग्नल

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Tata Elxsi Share Price
Apple : अ‍ॅपलने रचला इतिहास! ठरली जगातील पहिली ३ ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅप असणारी कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.