Tata Factory Fire: टाटा समूहाच्या आयफोन प्लांटला भीषण आग; 100हून अधिक पोलिस तैनात, पाहा- VIDEO

Tata Factory Fire: टाटा ग्रुपच्या एका प्लांटला भीषण आग लागली आहे. तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूरजवळील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये आज सकाळी आग लागली.
Tata factory fire Massive fire
Tata factory fire Massive fire Sakal
Updated on

Tata Factory Fire: टाटा ग्रुपच्या एका प्लांटला भीषण आग लागली आहे. तामिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूरजवळील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटमध्ये आज सकाळी आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी आणि मदतीसाठी हजर आहेत.

आग लागली तेव्हा प्लांटमध्ये अनेक कर्मचारी ड्युटीवर होते. कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू. कंपनीने पुढे सांगितले की, आगीचे कारण तपासले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मोबाईल फोन एक्सेसरीज पेंटिंग युनिटमध्ये पहाटे साडेपाच वाजता आग लागली. आग लागल्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. कर्मचारी व स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर काढण्यासाठी सात अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत कोणीही जखमी झाले नाही. ही दिलासादायक बाब आहे.

Tata factory fire Massive fire
Coldplay Concert: 'बुक माय शो'च्या सीईओला अटक होणार? कोल्डप्ले कॉन्सर्टचे प्रकरण पडणार महागात

1,500 कर्मचारी कंपनीत होते

आग लागली तेव्हा पहिल्या शिफ्टमध्ये सुमारे 1500 कर्मचारी ड्युटीवर होते. Tata Electronics Private Limited (TEPL) च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील होसूर येथील आमच्या प्लांटमध्ये आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आगीचे कारण तपासले जात आहे आणि आम्ही आमचे कर्मचारी आणि इतर भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू.

Tata factory fire Massive fire
Google: नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यापुढे गुगल झुकलं; 22,000 कोटी रुपये देऊन परत बोलावलं, पण का?

100 हून अधिक पोलिस तैनात

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वसनाचा त्रास होत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

100 हून अधिक पोलिसांचे पथक येथे तैनात करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीचा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयफोनसाठी अनेक उपकरणे तयार करणाऱ्या या कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या 4500 आहे. ही कंपनी 500 एकरवर पसरलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.