Tata Group: टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची मोठी घोषणा; कंपनी 5 लाख तरुणांना देणार रोजगार

Tata Group: टाटा समूहाने रोजगारासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार असल्याचे समूहाने सांगितले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ही माहिती दिली आहे.
Tata Group
Tata GroupSakal
Updated on

Tata Group: टाटा समूहाने रोजगारासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार असल्याचे समूहाने सांगितले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ही माहिती दिली आहे. चंद्रशेखरन यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीशी संबंधित उद्योग अशा इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या दिल्या जातील.

चंद्रशेखरन यांनी इंडियन क्वालिटी मॅनेजमेंट फाऊंडेशनच्या चर्चासत्रात ही घोषणा केली आहे. या घोषणेदरम्यान त्यांनी उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करण्यावर भर दिला आणि भारताच्या विकसित होण्याच्या ध्येयामध्ये हे क्षेत्र महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जर आपण उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या वाढवू शकलो नाही, तर आपण विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही.

Tata Group
Timberland: ईशा अंबानींची मोठी डील; टिंबरलँडचे भारतात पुनरागमन, कोणत्या प्लॅटफॉर्मवर खरेदी करता येणार?
काय म्हणाले चंद्रशेखरन?

टाटा समूहाने विविध क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीच्या आधारे या नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. चंद्रशेखरन म्हणाले, सेमीकंडक्टर, उत्पादन, असेंबली, इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीशी संबंधित आमच्या अनेक गुंतवणुकीच्या आधारे, मला वाटते की आम्ही पुढील 5 वर्षांत रोजगार निर्माण करू.

Tata Group
Apple: ॲपलचा मेगा प्लॅन; आता पुण्यात तयार होणार कंपनीचे AirPods, काय फायदा होणार?

टाटा समूह आसाममध्ये सेमीकंडक्टर प्लांट आणि इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीशी संबंधित अनेक युनिट्सची स्थापना करत आहे. चंद्रशेखरन यांच्या मते, या नोकऱ्यांचा खूप सकारात्मक परिणाम होईल. चंद्रशेखरन यांनीही या उपक्रमांसाठी सरकारी मदतीची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, वाढत्या कर्मचाऱ्यांची पूर्तता करण्यासाठी भारताला अंदाजे 10 कोटी रोजगार निर्माण करावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.