Ratan Tata Health Update: रतन टाटांची तब्येत बिघडली? सोशल मिडियावर पोस्ट करून केला अफवेचा खुलासा

Ratan Tata Hospitalised: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहवालानुसार, टाटांना सोमवारी पहाटे रुग्णालयात नेण्यात आला.
Ratan Tata Health Update
Ratan Tata Health UpdateSakal
Updated on

Ratan Tata Hospitalised: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टाटांना सोमवारी पहाटे रुग्णालयात नेण्यात आले. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की रतन टाटा यांना 12.30-1 च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांचा रक्तदाब खूपच कमी झाला होता आणि त्यांना ताबडतोब आयसीयूमध्ये नेण्यात आले होते, प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शारुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. असा दावा करण्यात आला होता मात्र टाटांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Ratan Tata Health Update
Narishakti Success Story: आजीच्या हातची चव पोहचली जगभरात; दोन बहिणींनी 5 लाखात सुरु केला व्यवसाय, आज आहे 10 कोटींचा ब्रँड

रतन टाटांनी पोस्ट करत माहिती दिली की, माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अलीकडील अफवांची मला जाणीव आहे आणि हे दावे निराधार आहेत याची मी सर्वांना खात्री देतो. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. मी विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे.'

Ratan Tata Health Update
OLA CEO: 'कॉमेडियन बनू शकला नाही अन्...' ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल कुणाल कामरावर का भडकले?

रतन नवल टाटा हे भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत. 1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून टाटा समूहाचे प्रमुख होते. ते ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत अंतरिम अध्यक्षही होते. रतन टाटा हे सध्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत आहेत. रतन नवल टाटा यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.