Tata Motors: टाटा मोटर्सची वाहने 'या' महिन्यापासून होणार महाग; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

Tata Motors Price: टाटा समूहाची वाहन क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार आहे. व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवीन किंमत 1 जुलै 2024 पासून लागू होईल.
Tata Motors to hike prices
Tata Motors to hike pricesSakal
Updated on

Tata Motors Commercial Vehicles: टाटा समूहाची वाहन क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार आहे. व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवीन किंमत 1 जुलै 2024 पासून लागू होईल.

टाटा मोटर्सने निवेदनात म्हटले आहे की, वस्तूंच्या (पेट्रोल, डिझेल) किमती वाढल्यामुळे कंपनी वाहनांच्या किमतीत वाढ करत आहे. 1 जुलैपासून नवीन वाहनांना लागू होणारी किंमत विविध मॉडेल्स आणि वाहनांच्या प्रकारांसाठी वेगळी असेल. देशभरातील टाटांच्या वाहनांवर नवीन किंमत लागू होणार आहे.

कोणत्या वाहनांच्या किमती वाढणार?

टाटा समूहाची उपकंपनी असलेली टाटा मोटर्स लक्झरी कारपासून ते ट्रकपर्यंत वाहने तयार करते. कंपनी सध्या कार, पिकअप, ट्रक आणि बसेस तयार करते. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनेही बाजारात आणली आहेत.

टाटा मोटर्स ही सध्या व्यावसायिक वाहनांच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या यादीमध्ये मिनी ट्रक, ट्रक, बस आणि व्हॅन सारख्या वाहनांचा समावेश आहे.

Tata Motors to hike prices
Petrol-Diesel GST: पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटवर राज्य सरकारे का अडून बसली आहेत? महाराष्ट्र सरकार किती करते कमाई?

टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत घसरण

3.27 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप (टाटा मोटर्स एम-कॅप) असलेली कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आज घसरण होत आहे. सकाळी 11:43 वाजता कंपनीचे शेअर्स 0.18% घसरून 983.90 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

कंपनीच्या शेअर्सनी 1 वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 74 टक्के परतावा दिला आहे, तर 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Tata Motors to hike prices
PNB Alert: तुमचे देखील पीएनबी बँकेत खाते आहे? तर रहा सावधान; अन्यथा खाते होऊ शकते बंद

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.