Tata Motors: IPO लाँच होण्यापूर्वीच, टाटा मोटर्सने विकला टाटा टेक्नॉलॉजी मधील 9.9% हिस्सा, 'इतके' कोटी मिळणार

Tata Motors News: टाटा टेक्नोलॉजी ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे जी लवकरच IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Tata Motors
Tata MotorsSakal
Updated on

Tata Motors: टाटा मोटर्सने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की, ते टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडमधील 9.9 टक्के हिस्सेदारी विकणार आहे. कंपनी हा हिस्सा TPG Rise Climate ला विकणार आहे. या करारानंतर, टाटा टेक्नॉलॉजीजचे मूल्यांकन 16,300 कोटी रुपये झाल्याचा अंदाज आहे.

टाटा मोटर्सला आपला हिस्सा विकून 1614 कोटी रुपये मिळतील. टाटा मोटर्सचा शेअर आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 5.5 टक्क्यांच्या वाढीसह NSE वर 667 रुपयांवर बंद झाला.

TPG Rise Climate हा या व्यवहारातील प्रमुख गुंतवणूकदार आहे. या व्यवहारासह, टाटा टेक्नॉलॉजीजचे इक्विटी मूल्यांकन 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 16,300 कोटी रुपये इतके झाले आहे. हिस्सा विकण्याची प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा दोन्ही पक्षांना मान्य असेल अशा तारखेपर्यंत पूर्ण केली जाईल.

टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, टाटा टेक्नॉलॉजीजमधील 9 टक्के हिस्सा विकून TPG राइज क्लायमेटला 1467 कोटी रुपये मिळतील.

Tata Motors
Adani Group: गौतम अदानींना आणखी एक झटका, मुंबई विमानतळाच्या खात्यांची चौकशी सुरु

टाटा टेक्नोलॉजी ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे जी लवकरच IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. शेअर बाजार नियामकाकडून IPO लाँच करण्यास मंजुरी मिळाली आहे. टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओमध्ये सर्व शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जातील.

टाटा मोटर्सचा शेअर आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात साडेपाच टक्क्यांच्या वाढीसह 667 रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान 669 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. हा शेअर एका आठवड्यात 7.17 टक्के, एका महिन्यात 6.5 टक्के, तीन महिन्यांत सुमारे 8 टक्के आणि यावर्षी आतापर्यंत 72 टक्के वाढला आहे.

Tata Motors
UBS Report: SBI अन् Axis बँकेला दणका! UBS ब्रोकरेजने रेटिंग केले कमी, किरकोळ कर्जाबद्दल व्यक्त केली चिंता

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()