Tata Steel: टाटा स्टीलमधील 3,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार; काय आहे कारण?

Tata Steel: टाटा स्टील कंपनी ब्रिटनमधील व्यवसाय बंद करणार असून, त्यामुळे 3 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. ट्रेड युनियनच्या अधिकार्‍यांचा हवाला देत बीबीसीने दावा केला कंपनी आता ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट ब्लास्ट फर्नेस (लोखंड निर्मिती) बंद करत आहे.
Tata Steel to cut 3,000 jobs in Wales
Tata Steel to cut 3,000 jobs in Wales Sakal
Updated on

Tata Steel: टाटा स्टील कंपनी ब्रिटनमधील व्यवसाय बंद करणार असून, त्यामुळे 3 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. ट्रेड युनियनच्या अधिकार्‍यांचा हवाला देत बीबीसीने दावा केला आहे की, कंपनी आता ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट ब्लास्ट फर्नेस (लोखंड निर्मिती) बंद करत आहे. (Tata Steel Company to close business in UK)

कंपनीने या बाबातचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही. टाटा अधिकाऱ्यांनी लंडनमधील ताज हॉटेलमध्ये कामगार संघटनांसोबत बैठक घेतल्यानंतर ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यूकेमधील टाटा स्टीलचा व्यवसाय कंपनीसाठी तोट्याचा व्यवसाय बनला आहे. पोर्ट टॅलबोट प्लांटमुळे कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 6511 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

कंपनीने अलीकडेच ब्रिटीश सरकारसोबत करार केला आहे, ज्यानुसार ब्लास्ट फर्नेसेस (लोखंड निर्मिती) इलेक्ट्रिक फर्नेसने बदलण्यात येतील, ज्यामुळे खर्च कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल. हा करार सुमारे 61 कोटी डॉलरचा आहे.

Tata Steel to cut 3,000 jobs in Wales
Tech Layoffs: यूट्यूबचा मोठा निर्णय; 'इतक्या' कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

करारानुसार, वेल्समधील पोर्ट टॅलबोट प्रकल्पात एकूण 125 कोटी पौंडांची गुंतवणूक केली जाईल. यापैकी 50 कोटी पौंड म्हणजेच 61 कोटी डॉलर्स अनुदान स्वरूपात टाटा स्टीलला मिळणार आहेत. उर्वरित रक्कम टाटा स्टील गुंतवणार आहे.

टाटा स्टीलची ही गुंतवणूक यूकेच्या पोलाद क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. याआधी टाटा स्टीलने म्हटले होते की, जर सरकारने मदत केली नाही तर त्यांना प्लांट बंद करावा लागेल कारण पर्यावरण नियमांमुळे कंपनीचे नुकसान होत आहे.

Tata Steel to cut 3,000 jobs in Wales
राम मंदिर सोहळ्याला 'कोका कोला अन् हाजमोला'! काय आहे हे प्रकरण? अदानी अंबानींचही खास कनेक्शन

ब्लास्ट फर्नेस बंद करण्याऐवजी तो चालू ठेवण्याचा कामगार संघटनेने दिलेला प्रस्ताव टाटा स्टीलने फेटाळून लावला आहे. द गार्डियनच्या वृत्तातही असाच दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, ब्लास्ट फर्नेस बंद करण्याऐवजी, ट्रेड युनियनने तो चालू ठेवून हळूहळू इलेक्ट्रिक आर्कमध्ये शिफ्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.