Tata Group: सरकारकडून मंजूरी! टाटा बांधणार देशातील पहिला AI पॉवरचिप सेमीकंडक्टर प्लांट; इतक्या तरुणांना मिळणार रोजगार

India's First AI-Enabled Powerchip Semiconductor Plant: सेमीकंडक्टर उद्योगात भारताने एक नवीन सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली आहे.
Tata Group
Tata GroupSakal
Updated on

India's First AI-Enabled Powerchip Semiconductor Plant: सेमीकंडक्टर उद्योगात भारताने एक नवीन सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. त्यापैकी 2 प्रकल्प गुजरातमध्ये आणि एक आसाममध्ये आहे. (Tata to set up country s first AI enabled Power chip semiconductor plant investment of Rs 91000 crore)

या प्रकल्पाची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले - उज्ज्वल भविष्याच्या दिशेने आम्ही एक मोठे पाऊल उचलत आहोत. सेमीकंडक्टर प्रकल्प भारताला आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेकडे घेऊन जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

Tata Group
Gold Loan: गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी RBIने घेतली कठोर भूमिका; बँकांकडून मागवली माहिती, काय आहे प्रकरण?

भारतामध्ये सेमीकंडक्टर फॅब्स स्थापन करण्यासाठी सुधारित योजनेअंतर्गत, टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) द्वारे धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रीजन (DSIR) येथे सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा सुरु केली जाईल.

एकूण 91,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हे देशातील पहिले व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब असेल. या प्रदेशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कुशल नोकऱ्या निर्माण होतील.

Tata Group
GoAir: तिकीटाचा घोळ अन् एक लाखाचा दंड; गुजराती प्रवाशाने शिकवला विमान कंपनीला धडा, काय आहे प्रकरण?

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी जानेवारी 2024 मध्ये 20 व्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅब तयार करण्याचा टाटा समूहाचा निर्णय जाहीर केला होता. नियोजित सेमीकंडक्टर फॅबवर भाष्य करताना ते म्हणाले, टाटा समूहाला अनेक क्षेत्रात आघाडीवर राहण्याची परंपरा आहे.

देशात 1 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार

भारत प्रथमच ऑटोमोटिव्ह, कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्केटमधील देशांतर्गत आणि जागतिक ग्राहकांकडून वाढती चिपची मागणी पूर्ण करण्यास सक्षम असेल. ढोलेरा साठी टाटा समूहाच्या मल्टी-फॅब व्हिजनमध्ये 1,00,000 हून अधिक कुशल नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Tata Group
Anil Ambani: कर्जबाजारी अनिल अंबानींना मिळणार 4,000,00,00,000 रुपयांचा चेक, पण हातून जाणार मोठा प्रकल्प

सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग (ATMP) साठी सुधारित योजनेअंतर्गत टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) द्वारे मोरीगाव, आसाम येथे आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (OSAT) सुविधा स्थापन केली जाईल. त्याची एकूण गुंतवणूक अंदाजे 27,000 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.