Income Tax Notice: टाटा समूहाच्या 40,000 कर्मचाऱ्यांना आयकर विभागाने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

Income Tax Notice For TCS Employees: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर विभागाने डिमांड नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये या कर्मचाऱ्यांना टीडीएस भरण्यास सांगण्यात आले आहे.
Income Tax Notice For TCS Employees
Income Tax Notice For TCS EmployeesSakal
Updated on

Income Tax Notice For TCS Employees: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर विभागाने डिमांड नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये या कर्मचाऱ्यांना टीडीएस भरण्यास सांगण्यात आले आहे.

TCS च्या अंदाजे 30,000 ते 40,000 कर्मचाऱ्यांना कर मागणीशी संबंधित नोटीस मिळाली आहे. कंपनीच्या कॉम्प्युटरमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे कंपनी आयकर विभागाला योग्य माहिती देऊ शकली नाही, असे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.