CEO K Krithivasan Salary: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी संभाळणारे के कृतिवासन यांचा पगार किती?

TCS CEO K Krithivasan Salary: आयटी उद्योगात काम करणारे अनेक लोक आहेत ज्यांचे स्वप्न टीसीएसमध्ये काम करण्याचे आहे. TCS चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के कृतिवासन हे FY24 मध्ये 25 कोटींपेक्षा जास्त पगार घेतील
TCS CEO K Krithivasan Salary
TCS CEO K Krithivasan SalarySakal
Updated on

TCS CEO K Krithivasan Salary: आयटी उद्योगात काम करणारे अनेक लोक आहेत ज्यांचे स्वप्न टीसीएसमध्ये काम करण्याचे आहे. TCS चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के कृतिवासन हे FY24 मध्ये 25 कोटींपेक्षा जास्त पगार घेतील, असे कंपनीने गुरुवारी सांगितले.

राजेश गोपीनाथन हे अचानक कंपनीतून बाहेर पडल्यानंतर जून 2023 मध्ये देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे प्रमुख म्हणून कृतिवासन यांनी पदभार स्वीकारला. त्यांची नियुक्ती पाच वर्षासाठी झाली आहे.

आर्थिक वर्ष 2023मध्ये, TCSचे माजी सीईओ राजेश गोपीनाथन यांचे संपूर्ण आर्थिक वर्षात 29.16 कोटी रुपयांचे उत्पन्न होते. के कीर्तीवासन यांना त्यांच्या कामासाठी 25.2 कोटी रुपये दिले आहेत.

त्यांना 1 जून 2023 पासून पाच वर्षांसाठी TCS चे CEO आणि MD बनवण्यात आले आहे. याआधी, ते 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 पर्यंत बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) चे जागतिक प्रमुख होते. यानंतर त्यांनी 1 जून 2023 पासून पाच वर्षांसाठी कंपनीच्या सीईओ आणि एमडीची जबाबदारी स्वीकारली.

TCS CEO K Krithivasan Salary
Who is Sanjiv Goenka: केएल राहुलला झापणारे, धोनीला कर्णधारपदावरून हटवणारे; कोण आहेत संजीव गोयंका?

सीओओ एनजी सुब्रमण्यम यांचा पगार किती होता?

विशेष म्हणजे कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) एनजी सुब्रमण्यम यांनी गेल्या आर्थिक वर्षात 26.18 कोटी रुपये कमावले. लवकरच कंपनीतून निवृत्त होणारे सुब्रमण्यम वर्षभर या पदावर होते.

त्यांना 1.72 कोटी रुपये पगार, तसेच 3.45 कोटी रुपये लाभ आणि भत्ते आणि 21 कोटी रुपये कमिशन म्हणून मिळाले. कंपनीच्या सीओओचे मानधन त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी मानधनाच्या 346.2 पट आहे. 31 मार्च 2024 पर्यंत कर्मचाऱ्याचे सरासरी मानधन 6,01,546 रुपये होते.

TCS CEO K Krithivasan Salary
Share Market Closing: शेअर बाजारात भूकंप; निर्देशांक दीड टक्क्यांनी घसरले; या मोठ्या घसरणीमागे कोण?

TCS कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ?

कर्मचाऱ्यांसाठी सरासरी वार्षिक पगारवाढ 5.5 टक्क्यांपासून ते 8 टक्क्यांपर्यंत आहे, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दुहेरी अंकी पगार वाढ मिळाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की आर्थिक वर्षाच्या अखेरीस, त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी 35.6 टक्के महिला होत्या. कंपनीचे सुमारे 55 टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.