TCS Employees: टाटांच्या TCS कंपनीचा मोठा निर्णय! ऑफिसमध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात

TCS Variable Pay News: देशातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएसने आता नवा नियम जारी केला आहे. कंपनीच्या नवीन धोरणानुसार ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 60 टक्क्यांपेक्षा कमी असेल त्यांना तिमाही बोनस मिळणार नाही.
TCS employees to get variable pay based on office attendance Report
TCS employees to get variable pay based on office attendance Report Sakal
Updated on

TCS Variable Pay News: देशातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएसने आता नवा नियम जारी केला आहे. कंपनीच्या नवीन धोरणानुसार ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 60 टक्क्यांपेक्षा कमी असेल त्यांना तिमाही बोनस मिळणार नाही. आयटी कंपनीने नुकतेच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसला येण्यास सांगितले होते. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करणे बंधनकारक केले होते, मात्र त्यानंतरही अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये येत नव्हते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नवीन धोरणात असे म्हटले आहे की जे कर्मचारी कार्यालयात आले नाहीत त्यांना तिमाही बोनस मिळणार नाही. त्रैमासिक बोनसचा लाभ घेण्यासाठी, तुमची ऑफिसमधील उपस्थिती 60 ते 75% च्या दरम्यान असावी.

ज्या कर्मचाऱ्यांची ऑफिसमधील उपस्थिती 75 ते 85 टक्के आहे त्यांना 75 टक्के व्हेरिएबल पे दिला जाईल.

TCS employees to get variable pay based on office attendance Report
Apple Jobs: ॲपल भारतात करणार मेगा नोकर भरती; पुढील 3 वर्षात 5 लाख लोकांना मिळणार रोजगार

कोणाला किती व्हेरिएबल पे मिळेल?

  • जे कर्मचारी 60% पेक्षा कमी दिवस ऑफिसमध्ये येतात त्यांना कोणतेही व्हेरिएबल पे मिळणार नाही.

  • याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 60 ते 75% दरम्यान आहे त्यांना 50% व्हेरिएबल पे मिळेल.

  • ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 75 ते 85% दरम्यान आहे त्यांना 75% व्हेरिएबल पे मिळेल.

  • ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 85% आहे त्यांना पूर्ण व्हेरिएबल पे मिळेल.

कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट

TCS शेअर बाजारात 2004 मध्ये लिस्ट झाली. गेल्या 19 वर्षांत प्रथमच वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत आर्थिक वर्षासाठी 13,249 पेक्षा जास्त घट झाली आहे.

TCS employees to get variable pay based on office attendance Report
Bank Holidays May: मे महिन्यात इतके दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

व्हेरिएबल पे म्हणजे काय?

व्हेरिएबल पे, ज्याला परफॉर्मन्स-लिंक्ड पे म्हणूनही ओळखले जाते, हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित पगारा व्यतिरिक्त दिला जाता. व्हेरिएबल पे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार दिला जातो.

कार्यालयात न आल्यावर कारवाई

अहवालानुसार, नवीन धोरणात असा इशारा देण्यात आला आहे की ऑफिसमधील उपस्थिती कमी राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कंपनीने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याच्या कामाचा प्रत्येक तिमाहीत आढावा घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.