TCS Job Scam: TCS नोकर भरती घोटाळा प्रकरणी कंपनीची मोठी कारवाई, 16 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

TCS Job Scam: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ने आता नोकरभरती घोटाळ्याबाबत मोठी कारवाई केली आहे.
TCS Job Scam
TCS Job ScamSakal
Updated on

TCS Job Scam: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ने आता नोकरभरती घोटाळ्याबाबत मोठी कारवाई केली आहे. नुकताच उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे कंपनीने आपल्या 16 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, तर 6 संस्थांवर बंदी घातली आहे. कंपनीने 15 ऑक्टोबर रोजी एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या तीन वर्षांत कंपनीने कंत्राटदारांसह 3 लाख लोकांना कामावर घेतले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांनी किमान 100 कोटी रुपये कमावल्याचाही अंदाज आहे.

टाटा ग्रुपच्या आयटी कंपनीने रविवारी संध्याकाळी उशिरा या कारवाईबाबत निवेदन जारी केले. कंपनीने सांगितले की, भरती घोटाळ्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान, कंपनीचे 19 कर्मचारऱ्यांचा भरती घोटाळ्यात हात असल्याचे आढळले. त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकले, तर 3 कर्मचाऱ्यांना रिसोर्स मॅनेजमेंट युनिटमधून काढून टाकण्यात आले.

TCS Job Scam
2000 Note : दोन हजाराच्या नोटांचे आता काय?

के कृतिवासन यांनी टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली आणि हे प्रकरण उघडकीस आले. सीईओ पदाची सूत्रे हाती घेताच त्यांना हे मोठे आव्हान पेलावे लागले.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर टीसीएसने कडक भूमिका घेतली होती. ही बाब जून 2023 मध्ये उघडकीस आली आणि त्याचवेळी कंपनीने तपास सुरू केला. तब्बल 4 महिने चाललेल्या तपासानंतर टीसीएसने आता ही कारवाई केली आहे. आगामी काळात कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी काम करणार असल्याचे TCS ने सांगितले.

TCS Job Scam
Share Market Today: शेअर बाजार सुरु होण्याआधी 'या' 10 शेअर्सवर ठेवा नजर, होईल फायदा

3 वर्षात 3 लाख भरती

TCS ही भारतात सर्वाधिक नोकऱ्या देणारी कंपनी आहे. 2022 च्या अखेरीस TCS कर्मचाऱ्यांची संख्या 6.15 लाख होती. गेल्या 3 वर्षात, कंपनीने सुमारे 3 लाख नोकर भरती केली आहे आणि अलीकडील काही महिन्यांत 50 हजार लोकांना कामावर घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.