Tata Group : टाटा समूहाच्या TCS कंपनीमध्ये मोठा बदल; कंपनीच्या सीईओने दिला राजीनामा, कारण...

राजेश गोपीनाथन यांनी सीईओ म्हणून सहा वर्षे पूर्ण केली
TCS
TCS Sakal
Updated on

TCS CEO Rajesh Gopinathan Resigns : टाटा कंसल्टेंसी सर्विसेज लिमिटेडने गुरुवारी कंपनीचे CEO म्हणून के क्रितिवासन यांची नियुक्ती केली. जानेवारीमध्ये, राजेश गोपीनाथन यांनी सीईओ म्हणून सहा वर्षे पूर्ण केली आणि त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत वाढवण्यात आला.

मात्र 16 मार्च रोजी त्यांनी राजीनामा दिला. TCS बोर्डाने 16 मार्च 2023 पासून सीईओ पदासाठी के क्रितिवासन यांची नियुक्ती केली आहे. गोपीनाथन यांना नवीन येणाऱ्या CEO ला मदत करण्यासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीत राहतील.

नवीन सीईओ क्रितिवासन 34 वर्षांपासून TCS शी संबंधित :

क्रितिवासन सध्या TCS येथे बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) व्यवसाय समूहाचे अध्यक्ष आणि जागतिक प्रमुख आहेत. कृतिवासन हे 34 वर्षांहून अधिक काळ ग्लोबल टेक्नॉलॉजी सेक्टरचा एक भाग आहेत.

1989 मध्ये ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले. TCS मधील त्यांच्या दीर्घ कार्यकाळात, कृतिवासन यांनी विक्री, ग्राहक संबंध व्यवस्थापन आणि वितरण या क्षेत्रात काम केले आहे.

गोपीनाथन यांनी TCS चे मुख्य वित्तीय अधिकारी यांच्यासह अनेक पदे भूषवली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, TCS चे शेअर्स गेल्या तिमाहीत जवळपास तिप्पट झाले आहेत आणि महसूल जवळपास दुप्पट झाला आहे. तसेच TCS च्या नफ्यात जवळपास 60% वाढ झाली आहे.

मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये पदवी :

कृतिवासन यांनी कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. ही तीच संस्था आहे जिथे टाटा समूहाचे अध्यक्ष आणि TCS चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एन चंद्रशेखरन यांनी शिक्षण घेतले होते.

त्यांनी 1987 मध्ये IIT कानपूरमधून औद्योगिक आणि व्यवस्थापन अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी देखील पूर्ण केली आहे.

राजेश गोपीनाथन हे 22 वर्षांपासून टीसीएसशी संबंधित होते :

TCS ने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “TCS सह 22 वर्षांच्या उत्कृष्ट कारकीर्दीनंतर आणि गेल्या 6 वर्षांमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, राजेश गोपीनाथन यांनी त्यांच्या इतर कामांसाठी जोपासण्यासाठी कंपनीतून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे."

TCS
Patanjali Shares : कंपनीचे लाखो शेअर्स फ्रीज झाल्यानंतर रामदेव बाबा यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले...

टीसीएसचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी राजेश यांच्या राजीनाम्यावर सांगितले की, “गेल्या 25 वर्षांपासून मला राजेशसोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आहे.

या कालावधीत राजेश यांनी मुख्य वित्तीय अधिकारी या पूर्वीच्या भूमिकेसह विविध भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले आहे. गेल्या 6 वर्षांत, राजेश यांनी MD आणि CEO म्हणून चांगले काम केले आहे.

TCS च्या वाढीच्या पुढील टप्प्याचा पाया रचला आहे. TCS मध्ये राजेशच्या अतुलनीय योगदानाबद्दल मी मनापासून कौतुक करतो. मी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.''

TCS
ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.