TCS Recruitment Delay IT Company Receives Notice From Maharashtra's Labour Ministry know details
TCS Recruitment Delay IT Company Receives Notice From Maharashtra's Labour Ministry know details Sakal

Tata Group: कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास उशीर... TCS ला महाराष्ट्र सरकारची कारणे दाखवा नोटीस!

TCS Recruitment Delay: महाराष्ट्र सरकारने टीसीएस कंपनीला नोटीस पाठवली आहे.
Published on

TCS Recruitment Delay: महाराष्ट्र सरकारने टीसीएस कंपनीला नोटीस पाठवली आहे. पुण्यातील आयटी संघटनेच्या तक्रारीवरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने पाठवलेल्या या नोटीसमध्ये टीसीएसच्या व्यवस्थापनाला 2 नोव्हेंबर रोजी आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.

नोकरीसाठी निवड झालेल्या 200 कर्मचाऱ्यांना कंपनीत रुजू केले गेले नाही. NITES ने जुलैमध्ये केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार केली होती. ही तक्रार केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडे पाठवली होती.

NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणाले की, कंपनीत नोकरीसाठी रुजू होण्यास उशीर होत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता 2,000 झाली आहे. त्यांच्यामध्ये 1.8 ते 15 वर्षांचा अनुभव असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे लोक सध्या बेरोजगार आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही.

TCS Recruitment Delay IT Company Receives Notice From Maharashtra's Labour Ministry know details
Bank Holidays November 2023: सणासुदीत बँकांना असणार 'एवढ्या' दिवस सुट्या, पाहा संपूर्ण यादी

उमेदवारांना पगार देण्याची मागणी

NITES ने मंत्रालयाकडे या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी TCS कंपनीला निर्देश दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना जॉईन होण्यास उशीर झाल्यास पूर्ण पगार मिळावा. या कर्मचाऱ्यांना TCS च्या कर्मचारी सहाय्य योजनेचा लाभ देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

TCS Recruitment Delay IT Company Receives Notice From Maharashtra's Labour Ministry know details
SEBI Action: सेबीने 'बाप ऑफ चार्टवर' घातली बंदी, 17 कोटी रुपये परत करण्याचे दिले आदेश

हे कर्मचारी बेंगळुरू, पुणे, कोची, भुवनेश्वर, दिल्ली-एनसीआर सारख्या मोठ्या शहरांमधील आहेत. या उमेदवारांची नियुक्ती जानेवारी ते एप्रिल दरम्यान झाली. सुरुवातीला रुजू होण्यास एक महिना उशीर झाला.

त्यानंतर यातील अनेक उमेदवारांना रुजू होण्यासाठी दोन किंवा अधिक दिवसांच्या तारखा देण्यात आल्या. 10 जुलै रोजी त्यांच्यापैकी अनेकांना ईमेलद्वारे कळवण्यात आले की त्यांची जॉइनिंगची तारीख ऑक्टोबरमध्ये निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com