TCS Company: टीसीएस कंपनीचा कर्मचाऱ्यांना झटका! 1 ऑक्टोबरपासून होणार...

TCS Work From Home Ends: कंपनीने कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे ही माहिती दिली.
tcs
tcs Sakal
Updated on

TCS Work From Home Ends: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने हायब्रीड वर्किंग पॉलिसी बंद केल्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे ही माहिती दिली. कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आयटी क्षेत्रात घरातून काम करण्याच्या धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, टीसीएस कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमधून काम करण्यास सांगितले आहे. कंपनीने आदेश दिले आहेत की कर्मचार्‍यांना 1 ऑक्टोबर 2023 पासून आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमध्ये यावे लागेल. सध्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस ऑफिसमध्ये यावे लागत होते.

tcs
Indian Startup Layoff: भारतीय स्टार्टअप्सनी गेल्या 2 वर्षात 30,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीत 6 लाख कर्मचारी काम करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये TCS मधील कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. याचे कारण म्हणजे कंपनी वर्क फ्रॉम होम बंद करत आहे.

कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 35 टक्के महिला कर्मचाऱ्यांनी म्हणजे 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी घरून काम न मिळाल्यास नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर काही महिलांनी नोकरीचा राजीनामाही दिला होता.

tcs
Bank Transfer: कॅब चालकाला लागली बंपर लॉटरी! खात्यात आले 9000 कोटी; बँकेच्या सीईओचा राजीनामा

कोरोनामध्ये सर्व कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले होते. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे काम अधिक सोपे झाले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर कंपनीने वर्क फ्रॉम होम बंद करुन ऑफिसमधून काम सुरू केल्याने अनेक महिला कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राजीनामे देले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.