Tea Price Hike: देशात चहा विकणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या, म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि Tata Consumer Products Limited (TCPL) लवकरच चहाच्या किमती वाढवणार आहेत. चहाचा कमी होत असलेला साठा आणि वाढत्या खर्चाचा परिणाम चहाच्या किमतींवर होऊ शकतो आणि लवकरच मोठ्या कंपन्या किमती वाढवू शकतात.
याचा थेट परिणाम सुपरमार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या चहाच्या किमतीवर होणार आहे. यामुळे ग्राहकांना आता चहा पिण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.