झेरॉक्स कंपनीचा धक्कादायक निर्णय! 3,000 कर्मचार्‍यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

Tech Layoffs 2024: झेरॉक्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 15 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस, झेरॉक्समध्ये अंदाजे 20,500 कर्मचारी होते. या निर्णयानंतर कंपनीतील 3,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
Tech Layoffs 2024 Xerox to fire over 3000 employees
Tech Layoffs 2024 Xerox to fire over 3000 employeesSakal
Updated on

Tech Layoffs 2024: झेरॉक्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 15 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस झेरॉक्समध्ये अंदाजे 20,500 कर्मचारी होते. या निर्णयानंतर कंपनीतील 3,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर झेरॉक्सचे शेअर्स 12 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

नवीन ऑपरेटिंग मॉडेलची अंमलबजावणी करण्यासाठी झेरॉक्सने कर्मचार्‍यांची 15 टक्के कपात केली आहे. या कपातीचा सर्वाधिक फटका कोणत्या विभागांना बसणार आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

कंपनी स्थानिक वर्क कौन्सिल आणि कर्मचारी प्रतिनिधी संस्थांशी विचारविनिमय केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल. कपातीमुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी आर्थिक मदत देऊ शकते.

Tech Layoffs 2024 Xerox to fire over 3000 employees
IPO News: नवीन वर्षात पहिला आयपीओ 9 जानेवारीला होणार खुला; 1,000 कोटी उभारण्याचा कंपनीचा प्लॅन

गेल्या वर्षभरापासून जगभरात एकूण 2.61 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. एकट्या भारतात गेल्या वर्षी सुमारे 18,000 लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. 'लेऑफ-फाय' या जागतिक स्तरावर कर्मचारी कपातीवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने ही माहिती गोळा केली आहे.

आकडेवारीनुसार, संपूर्ण जगात सुमारे 70 टक्के कर्मचारी कपात एकट्या अमेरिकेत झाली आहे. यानंतर या यादीत भारत दुसऱ्या तर इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये कोणत्या देशांमध्ये किती कर्मचारी कपात झाली ते तुम्ही खाली पाहू शकता-

  • अमेरिका : 1.79 लाख

  • भारत: 18 हजार

  • जर्मनी: 13.1 हजार

  • युनायटेड किंगडम: 9.4 हजार

Tech Layoffs 2024 Xerox to fire over 3000 employees
Tata Motors: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी; जेपी मॉर्गनने 36 टक्क्यांनी वाढवली टारगेट प्राइस

आकडेवारीनुसार, एड-टेक क्षेत्रातील सर्वाधिक 4,700 लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यानंतर फुड (4,700), वित्त (2,765), किरकोळ (2,141), ग्राहक (1,772) आणि आरोग्य सेवा (991) क्षेत्रातून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.