Investment : Term Insurance घेण्याकडे भारतातील महिलांचा कल वाढतोय, पण का?

Term Insurance : याचा अर्थ असा की स्त्रिया आता फक्त अधिक विमा खरेदी करत नाहीत, तर त्या अधिक कव्हरेज असलेल्या पॉलिसींची देखील निवड करत आहेत.
Investmemt Tips for womens
Investmemt Tips for womensesakal
Updated on

Term Insurance :

कुठलेही आर्थिक नियोजन विम्याशिवाय अपूर्णच आहे. कारण, आर्थिक नियोजनात मुदत विमा महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळेच, प्रत्येकजण विम्याचे संरक्षण कवच घेण्याचा विचार करतो. केवळ पुरूष नाही तर महिलाही टर्म इन्शुरन्सचा विचार करत आहेत. यासंबंधिची एक आकडेवारी समोर आली आहे.

दीर्घकालीन योजना आखताना अर्थ तज्ज्ञ लोकांना मुदतीच्या विम्याचा विचार करण्याचा सल्ला देतात. नुकत्याच आलेल्या एका अहवालाने महिलांचे टर्म इन्शुरन्सकडे वाढलेला कल दर्शवला आहे. जो समाधानकारक असल्याची चर्चा सुरू आहे.  

Investmemt Tips for womens
SIP Investment : ‘एसआयपी’ गुंतवणूक विक्रमी २३ हजार कोटींवर; जुलैमध्ये गुंतवणुकीत १० टक्के वाढ; इक्विटी फंडातील ओघ आटला

देशातील महिलांमध्ये टर्म इन्शुरन्सची लोकप्रियता  वाढत असल्याचे अहवालातून दिसून आले आहे. आता महिला अधिक मुदतीचा विमा खरेदी करत आहेत, जे आर्थिक नियोजनाबाबत त्यांची वाढलेली जागरूकता दर्शवते.

महिलांकडून टर्म इन्शुरन्स खरेदी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कुटुंबासाठी आर्थिक नियोजनात त्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका. स्त्रिया घर सांभाळणाऱ्या असोत किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या असोत, प्रत्येक परिस्थितीत त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Investmemt Tips for womens
Nashik Crop Insurance : एक रुपयांत पिकविम्यासाठी बांधावर जनजागृती; भाजप किसान मोर्चाचा पुढाकार

विशेषत: नोकरदार महिला ज्या घरापासून दूर आहेत,त्या बाहेरगावी असलेल्या आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. समोर आलेली आकडेवारी देखील याची पुष्टी करते. टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यात नोकरदार महिलांचा सर्वाधिक वाटा आहे. या महिला ५५-६० टक्के पॉलिसी खरेदी करत आहेत.

नुकताच आलेला हा अहवाल पॉलिसीबाझार या विम्याशी संबंधित ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंपनीने तयार केला आहे. पॉलिसीबाजारच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत महिलांनी खरेदी केलेल्या मुदतीच्या योजनांच्या संख्येत ८० टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे.

या कालावधीत, हाय कव्हरसह पॉलिसी खरेदीमध्ये १२० टक्के वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की स्त्रिया आता फक्त अधिक विमा खरेदी करत नाहीत, तर त्या अधिक कव्हरेज असलेल्या पॉलिसींची देखील निवड करत आहेत. म्हणजेच, त्या अधिक विचार करत आहेत.

 टर्म इन्शुरन्स घेण्यामध्ये नोकरदार महिला पुढे आहेत आणि अधिक कव्हर निवडत आहेत. त्यांच्या आर्थिक भविष्याचा विचार करून ते जास्त कव्हर रक्कम निवडत आहेत. २०२२ पासून २ कोटी किंवा त्याहून अधिक कव्हर रकमेसह मुदत योजना खरेदी करण्याचा ट्रेंड जवळजवळ दुप्पट झाला आहे.

Investmemt Tips for womens
Nashik Crop Insurance : खरिपात 4 लाख हेक्टरलाच विम्याचे कवच! जिल्ह्यातील पिकांना 1 हजार 827 कोटींचे संरक्षण

टर्म इन्शुरन्समधील राज्यनिहाय आकडेवारी

  • दिल्ली - 8-10 %

  • हैदराबाद - 6-7 %

  • बेंगळुरू - 6-7 %

  • मुंबई - 4-5 %

  • गुंटूर 4-5 %

टर्म इन्शुरन्स घेणाऱ्या महिलांची वयोमानानुसार आकडेवारी

टर्म इन्शुरन्स बाबतची ही आकडेवारी उत्साहवर्धक आहे. महिलांनी देखील गंभीर आजारासाठी योग्य कव्हर रकमेसह रायडर घ्यावा, असा सल्ला टर्म इन्शुरन्सचे प्रमुख ऋषभ गर्ग यांनी दिला.

महिलांच्या आजारांसाठी टर्म इन्शुरन्स

महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, विविध विमा कंपन्यांनी त्यांच्या गंभीर आजाराच्या रायडरमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांचाही समावेश केला असल्याची माहिती ऋषभ गर्ग त्यांनी दिली.

Investmemt Tips for womens
Loss of Profit Insurance : "लॉस ऑफ प्रॉफिट इन्शुरन्स" चे कवच आता उद्योग विश्वासाठी हवेच - शशीकांत दहुजा

अनेक विमा कंपन्या आता खास महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थापन सेवा देखील पुरवत आहेत. त्यामध्ये वार्षिक ३६,५०० रुपयांपर्यंतचे फायदे समाविष्ट आहेत, ज्यात टेली-ओपीडी, मधुमेह, थायरॉईड, लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम सीरम आणि रक्त तपासणी यासारख्या सेवांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.