Post Office Scheme : गुंतवणूकीइतकीच व्याजाची रक्कम, पोस्ट ऑफीसची ही स्कीम देईल दुप्पट कमाई...

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये चांगले व्याज मिळत आहे.
The amount of interest equal to the investment this scheme of post office will give double the earnings
The amount of interest equal to the investment this scheme of post office will give double the earningsSakal
Updated on

तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आवडत असेल तर पोस्ट ऑफीसची ही स्कीम फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये चांगले व्याज मिळत आहे.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीद्वारे 10 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी एक गोष्ट करावी लागेल. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटद्वारे तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करु शकता.

पोस्ट ऑफिस स्‍कीमवर कार्यकाळानुसार (Tenure) वेगवेगळे व्याज उपलब्ध आहे. तुम्ही एका वर्षाच्या एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.9%, दोन वर्षांच्या एफडीवर 7%, तीन वर्षांच्या एफडीवर 7.1% आणि पाच वर्षांच्या एफडीवर 7.5% व्याज मिळते.

पण जर तुम्हाला तुमची रक्कम दुप्पट करायची असेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी 5 वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागेल आणि ही एफडी पुढील 5 वर्षांसाठी वाढवावी लागेल. 5 वर्षांच्या एफडीवरही कर लाभ मिळतो.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते तुम्ही वाढवूही शकता. 1 वर्षाची एफडी मॅच्युरिटीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत, 2 वर्षांची एफडी मॅच्युरिटी कालावधीच्या 12 महिन्यांच्या आत आणि 3 आणि 5 वर्षांची एफडी मॅच्युरिटी कालावधीच्या 18 महिन्यांच्या आत वाढवता येईल.

याशिवाय, खाते उघडतानाही, तुम्ही मॅच्युरिटीनंतर खाते वाढवण्याची विनंती करू शकता. मुदतपूर्तीच्या (Maturity) तारखेला संबंधित टीडी खात्यावर लागू होणारा व्याजदर एक्‍सटेंडेड पीरियडवर लागू होईल.

तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस कॅल्क्युलेटरनुसार, 5 लाखाच्या गुंतवणुकीवर, तुम्हाला 10 वर्षांत 5 लाख 51 हजार 175 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच 10 वर्षात तुम्ही 10 लाख 51 हजार 175 रुपयांचा फंड जमा करु शकाल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.