Adani Group
Adani GroupSakal

Adani Group: फायनान्शियल टाइम्सच्या लेखावर अदानी समूहाचे स्पष्टीकरण; म्हणाले, पत्रकारांनी...

अदानी समूहाने फायनान्शियल टाइम्सला पत्र पाठवून स्पष्टीकरण जारी केले आहे.
Published on

Adani Group: 22 मार्च 2023 रोजी, फायनान्शिअल टाईम्स वृत्तपत्राच्या वेबसाईटवर "Indian Data Reveals Adani empire’s reliance on offshore funding" या मथळ्यासह अदानी समूहासंबंधी एक लेख प्रकाशित झाला.

या संदर्भात अदानी समूहाने फायनान्शियल टाइम्सला पत्र पाठवून स्पष्टीकरण जारी केले आहे. पप्रकाशित केलेली आकडेवारी चुकीची असल्याचे म्हटले आहे. अदानी समूहाने फायनान्शिअल टाईम्सवर अदानी समूहाशी संबंधित डेटा चुकीचा आहे असा आरोप केला आहे.

22 मार्चच्या फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालात भारताच्या FDI रेमिटन्स आकडेवारीच्या विश्लेषणाचा हवाला देऊन दावा केला आहे की, अलीकडच्या काही वर्षांमध्ये समूहातील सर्व थेट विदेशी गुंतवणुकीपैकी निम्मी गुंतवणूक गौतम अदानी कुटुंबाशी संबंधित ऑफशोअर संस्थांमधून आली आहे.

अदानी समूहाच्या निवेदनात म्हटले आहे की फायनान्शिअल टाईम्सच्या बातमीने "मार्केटमध्ये आणि इतर माध्यमांमध्ये गैरसमज निर्माण केले आहेत आणि हा एक राजकीय मुद्दा बनला आहे,

Adani Group
Cattle Trading: आयआयटी दिल्लीच्या मुलींनी जनावरे खरेदीसाठी लाँच केलं अ‍ॅप; होतेय कोट्यावधींची कमाई

आम्हाला यावेळी ही माहिती सार्वजनिकपणे शेअर करण्यास भाग पाडले जात आहे. हे खेदजनक आहे, परंतु तुमच्या पत्रकारांनी सावध आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोन घेतल्याने ते टाळता आले असते," असे त्यात म्हटले आहे.

पत्रकारांच्या निष्काळजी कारभाराचा संदर्भ देत, अदानी समूहाच्या वतीने पत्रात म्हटले आहे की, जर तुमच्या पत्रकारांनी हे सर्व दाखले आणि इतर खुलासे विचारात घेतले असते, तर त्यांनी खोटी आकडेवारी प्रसिद्ध केली नसती.

वेबसाइटला लेख काढून टाकण्याची विनंती करून, समूहाने पत्राद्वारे म्हटले आहे, “आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्या वेबसाइटवरून कथा लेख काढून टाका. तुमच्या पत्रकारांनी सावध आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला असता तर हे टाळता आले असते.”

काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी अदानी समूहावर 20,000 कोटी रुपयांच्या बनावट आणि फसव्या व्यवहाराचा आरोप केला होता. ज्यामुळे आता राजकारण तापले आहे.

Adani Group
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.