Multibagger Stocks to Buy : 250 रुपयांपर्यंत जाईल 'हा' मल्टीबॅगर स्टॉक, 1 वर्षात 170% वाढ...

सीएलएसएने झोमॅटोवर 248 रुपयांचे टारगेट ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या वर्षभरात झोमॅटोची वाढ जोरदार झाली आहे.
Multibagger Stocks to Buy
Multibagger Stocks to Buy Sakal
Updated on

फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोच्या (Zomato) स्टॉकमध्ये सध्या चांगली वाढ होताना दिसून येत आहे. हा शेअर मंगळवारी सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. FY24 च्या वार्षिक अहवालात कंपनीची वाढ मजबूत आहे. चांगला आउटलतुक पाहता, ग्लोबल ब्रोकरेज स्टॉकबाबत सकारात्मक आहेत.

गेल्या एका वर्षात या शेअर्समथ्ये जोरदार वाढ दिसली आणि 170 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. युबीएसने झोमॅटोच्या स्टॉकमध्ये खरेदी सल्ला कायम ठेवला आहे. तसेच, प्रति शेअर टारगेट 250 रुपये ठेवण्यात आले आहे. सध्या हा शेअर 202 रुपयांवर ट्रेड करत आहे.

अशाप्रकारे, सध्याच्या किंमतीपासून स्टॉकमध्ये सुमारे 24 टक्क्यांची मजबूत वाढ दिसून येते. सीएलएसएने झोमॅटोवर 248 रुपयांचे टारगेट ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या वर्षभरात झोमॅटोची वाढ जोरदार झाली आहे.

या स्टॉकमध्ये एका वर्षात 170 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे. स्टॉकने 6 महिन्यांत 58 टक्के आणि 2024 मध्ये आतापर्यंत 62 टक्क्यांनी झेप घेतली आहे. 25 जून 2024 रोजी शेअर 1.79 टक्क्यांनी वाढला आणि 202.40 वर स्थिरावला.

झोमॅटोची वाढ स्विगीपेक्षा वेगवान झाल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. गुंतवणूक फर्म प्रोससच्या (Prosus) FY24 च्या वार्षिक अहवालानुसार, स्विगीची ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) 26% (YoY) वाढले आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील झोमॅटोच्या 36 टक्क्यांच्या वाढीपेक्षा ही वाढ कमी आहे. स्विगीची एकूण रेवेन्यू ग्रोथ 24% (YoY) होती, तर झोमॅटोची रेवेन्यू ग्रोथ 55.9% (YoY) होती. FY24 मध्ये स्विगीचा ट्रेडिंग लॉस 158 मिलियन डॉलरपर्यंत घसरला. तर या कालावधीत झोमॅटोने $5 m चा सकारात्मक EBITDA नोंदवला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.