शेअर बाजारात गुंतवणूक अतिशय अभ्यासपुर्ण केली तर तुम्हाला कधीही नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही. प्रत्येकवेळी महागडेच शेअर्स चांगला परतावा देतात असे काही नाही, पेनी स्टॉकही तुम्हाला दमदार नफा मिळवून देऊ शकतात फक्त तुमची पारखी नजर महत्त्वाची आहे. अशात तुम्ही चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (IFCI) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता.
स्टॉकची किंमत 70 रुपयांपेक्षा कमी आहे. शुक्रवारी, कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांहून अधिक वाढले आणि बीएसईवर 69.62 रुपयांवर बंद झाले. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचीही या कंपनीत गुंतवणूक आहे. आजच्या वाढीसह, कंपनीचे मार्केट कॅप 18,195 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 72 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 12.28 रुपये आहे.
कंपनीने चौथ्या तिमाहीत (Q4FY24) आणि पूर्ण आर्थिक वर्ष (FY24) दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कंपनीची निव्वळ विक्री आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत 46.4 टक्क्यांनी वाढून ती 413.65 कोटीच्या तुलनेत 605.42 कोटी झाली.
कंपनीने आर्थिक वर्ष 2023 चौथ्या तिमाहीत 241.18 कोटीच्या निव्वळ तोट्यातून वसुली करून आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत 157.32 कोटी निव्वळ नफा गाठला. म्हणजेच नफ्यात 165.2 टक्के नेत्रदीपक वाढ झाली आहे.
कंपनीची निव्वळ विक्री आर्थिक वर्ष 2024 मध्ये 17.2 टक्क्यांनी वाढून 1,986.58 कोटी झाली, जी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 1694.64 कोटी होती. कंपनी सलग 5 आर्थिक वर्ष तोट्यात होती, पण आर्थिक वर्ष 2024 मध्ये तिने 241.05 कोटीचा नफा नोंदवला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीला 119.78 कोटीचा तोटा झाला होता.
IFCI लिमिटेड ही आधी इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणून ओळखली जात होती, ही सरकारी मालकीची नॉन-बँकिंग फायनान्शियल इंस्टीट्यूशन आहे. विशेषतः भारतातील इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्ससाठी लॉन्ग टर्म आर्थिक सहाय्य देण्यासाठी 1948 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली.
कंपनी आता एअरपोर्ट्स, रोड्स टेलीकम्युनिकेशन, पॉवर, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरसह अनेक उद्योगांना सपोर्ट करणारी नॉन-बँकिंग फायनान्शिय वित्तीय कंपनी (NBFC) आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीटी (LIC) एप्रिल 2024 पर्यंत कंपनीत 1.86 टक्के हिस्सेदारी आहे. या पब्लिक सेक्टरमधील कंपनीमध्ये भारत सरकारचा 71.72 टक्के हिस्सा आहे. याशिवाय, FII कडे 2.31 टक्के, DII 1.94 टक्के आणि सार्वजनिक 20.33 टक्के शेअर्स आहेत.
गेल्या एका महिन्यात इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे शेअर्स 7 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 124 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे. या वर्षात कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 140 टक्क्यांनी घसरलेत. गेल्या एका वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 443 टक्के इतका मजबूत परतावा मिळाला आहे. एवढेच नाही तर गेल्या 4 वर्षात 851 टक्के इतका मोठा नफा कमावला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.