'ही' टायर कंपनी देणार 194 रुपयांचा डिव्हिडेंड, रेकॉर्ड डेट 25 जुलै...

MRF ltd Latest news In marathi | टायर कंपनी एमआरएफ (MRF) आर्थिक वर्ष 2024 साठी त्यांच्या शेअरहोल्डर्सना प्रति शेअर 194 रुपये फायनल डिव्हिडेंड अर्थात अंतिम लाभांश देणार आहे.
This tyre company will pay a dividend of Rs 194 record date 25 July
This tyre company will pay a dividend of Rs 194 record date 25 JulySakal
Updated on

टायर कंपनी एमआरएफ (MRF) आर्थिक वर्ष 2024 साठी त्यांच्या शेअरहोल्डर्सना प्रति शेअर 194 रुपये फायनल डिव्हिडेंड अर्थात अंतिम लाभांश देणार आहे. याची रेकॉर्ड डेट 25 जुलै आहे. या तारखेपर्यंत ज्या शेअरहोल्डर्सची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये शेअर्सचे मालक म्हणून दिसतात ते लाभांश प्राप्त करण्यास पात्र असतील.

कंपनीने मे महिन्यात जानेवारी-मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना जाहीर केले होते की तिच्या बोर्डाने 2024 च्या आर्थिक वर्षासाठी 10 रुपये फेस व्हॅल्यूसह प्रति शेअर 194 रुपये अंतिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.

एमआरएफने आधीच आर्थिक वर्ष 2024 मध्ये प्रत्येकी 3 रुपयांचे 2 अंतरिम लाभांश दिले आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, मार्च 2024 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 6,215.05 कोटी होता. या कालावधीत निव्वळ नफा 379.55 कोटी होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2024 साठी निव्वळ नफा 2,040.95 कोटी आणि महसूल 24,673.68 कोटी होता.

शुक्रवारी 19 जुलैला बीएसईवर एमआरएफच्या शेअरची किंमत 127988.75 रुपयांवर बंद झाली. कंपनीचे मार्केट कॅप 54200 कोटी आहे. जून 2024 च्या अखेरीस, प्रमोटर्कडे 27.78 टक्के हिस्सा होता आणि सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे 72.22 टक्के हिस्सा होता.

गेल्या एका वर्षात हा स्टॉक सुमारे 25 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 151,283.40 रुपये आहे आणि नीचांक 101,447 रुपये आहे. शेअरचा अप्पर प्राईस बँड 1,40,787.60 रुपये आहे आणि लोअर प्राइस बँड 1,15,189.90 रुपये आहे. तर सर्किट लिमिट 10 टक्के आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com