Inspirational Story : इंजिनिअरींग केलेले थ्री इडियट्स! नोकरीला लाथ मारली, आता कोट्यवधीची कंपनी उभारली

तीन मित्रांनी सुरु केलेल्या कंपनीने अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे.
Macfos Limited
Macfos LimitedSakal
Updated on

Inspirational Story Macfos Limited : तीन मित्रांनी सुरु केलेल्या कंपनीने अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. या कंपनीचे नावं आहे ‘मॅकफॉस लिमिटेड’. ही कंपनी मोठ्या मशीनचे इलेक्ट्रिक आणि मेकॅनिक पार्ट विकते. कंपनी ही सर्व उत्पादने ई-कॉमर्स स्टोअर वरून विकते.

‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीने आर्थिक वर्ष FY21-22 मध्ये 2.05 लाख ऑर्डरद्वारे 80,000+ ग्राहकांना सेवा दिली आहे. कंपनीने या सर्व सेवा देशभरात एकूण 10,153 पिन कोडमध्ये सेवा प्रदान केली आहे.

कंपनीच्या मुख्य ग्राहक वर्गामध्ये कॉर्पोरेट कंपन्या आणि किरकोळ ग्राहक जसे की इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीचे विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि संशोधक यांचा समावेश आहे.

मॅकफॉस लिमिटेड ही एक ई-कॉमर्स आधारित कंपनी आहे जी तिच्या वेबसाइट आणि मोबाइल ऍप्लिकेशन Robu.in द्वारे 12,000+ इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे मार्केटिंग आणि वितरण करते.

कंपनीची उत्पादने रोबोटिक्स, ऑटोमेशन, ड्रोन, इलेक्ट्रिक वाहने, 3D प्रिंटिंग आणि ऑटो वाहने यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासह मूलभूत आणि प्रगत अभियांत्रिकी उत्पादने आणि प्रकल्पांमध्ये वापरली जातात.

असा उभा केला व्यवसाय :

मॅकफॉस लिमिटेड कंपनी अतुल मारुती डुंबरे, बिनोद प्रसाद आणि नीलेशकुमार पुरुषोत्तम चव्हाण या तीन मित्रांनी मिळून ही कंपनी सुरु केली. या तिघांनीही 2010 मध्ये अभियांत्रिकीमधून पदवी प्राप्त केली आणि विविध कंपन्यांकडून चांगल्या पगाराच्या ऑफर होत्या.

पण तरीही वर्षभर नोकरी केली आणि ती सोडून त्यांनी मॅकफॉस लिमिटेड कंपनीची स्थापना केली. कंपनी सुरु करताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. सुरुवातीला त्यांनी चपाती बनवण्याचे यंत्र बनवायचे ठरवले.

त्यांना मशीन बनवण्यामध्ये, बाजाराचा अभ्यास किंवा टाइमलाइनमध्ये कोणतेही कौशल्य न घेता त्यांनी 2 वर्षे संघर्ष केला. काही काळानंतर मशीन बनवण्याचा व्यवसाय थांबवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या डोक्यातला विचार काही केल्या थांबत नव्हता.

पुन्हा 6 महिने कंपनी सुरु करण्याच्या अगोदर त्यांनी मार्केट समजून घेण्यासाठी ते अनेक विद्यार्थी, व्यक्ती, कंपन्या आणि इतर संस्थांना भेटले आणि त्यांच्या लक्षात आले की ज्यांना इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर उत्पादनांची आवश्यकता आहे.

ती उत्पादने भारतात सामान्यपणे उपलब्ध नव्हती आणि ती खूप महाग होती आणि ही उत्पादने परदेशातून मिळवणे कठीण होते. चपाती बनवण्याचे यंत्र बनवल्यानंतर त्याची विक्री कुठे करावी हे त्यांना कळत नव्हते.

Macfos Limited
American Bank Crisis : १६६ वर्षे जुनी क्रेडिट सुइस बँक बुडण्याच्या उंबरठ्यावर कशी पोहोचली? भारतावर परिणाम होणार का?

त्यानंतर त्यांनी थोडेसे नियोजन केले आणि मेहनतीने कमावलेल्या पैशाने ROBU.IN ही वेबसाइट चालू केली. या वेबसाइटचा जन्म 2014 मध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, घटक, रोबोटिक आणि यांत्रिक उत्पादनांसाठी एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून झाला.

शेअर बाजारात केला IPO लॉन्च :

2 वर्षांच्या संघर्षानंतर आणि मोठ्या अपयशानंतर या कंपनीचा जन्म झाला होता. त्यानंतर तीन मित्रांनी कंपनीला मोठे करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. आणि 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO बाजारात गुंतवणुकीसाठी खुला झाला.

कंपनीने आपल्या IPO मध्ये 10 रुपये दर्शनी मूल्याचे 2,328,000 इक्विटी शेअर्स जारी करण्याची घोषणा केली होती. या आयपीओ चा आकार 24 कोटी रुपये असेल असे कंपनीने जाहीर केले होते. IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल होता.

कंपनीचे शेअर्स 1 मार्च 2023 रोजी BSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध झाले. आणि आज कंपनीच्या शेअर्सची किंमत 126 रुपये आहे. अविरत संघर्षानंतर कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम तीन मित्रांनी मिळून केले.

Macfos Limited
SVB Collapse : अमेरिकेत मोठ्या बँका कोसळत आहेत? आपल्या देशातील बँका सुरक्षित आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.