टायटन (शुक्रवारचा बंद भाव : रु. ३४७४)

टाटा समूहातील टायटन ही कंपनी देशातील सर्वांत मोठी ज्वेलरी रिटेलर आहे. या कंपनीने घड्याळे, ज्वेलरी आणि आयवेअर श्रेणींमध्ये प्रसिद्ध ब्रँड आणि भिन्न ग्राहक अनुभवांतर्गत या क्षेत्रात नेतृत्व मिळवले आहे.
Titan Company
Titan Companysakal
Updated on

टाटा समूहातील टायटन ही कंपनी देशातील सर्वांत मोठी ज्वेलरी रिटेलर आहे. या कंपनीने घड्याळे, ज्वेलरी आणि आयवेअर श्रेणींमध्ये प्रसिद्ध ब्रँड आणि भिन्न ग्राहक अनुभवांतर्गत या क्षेत्रात नेतृत्व मिळवले आहे. ही कंपनी तनिष्क, मिया, झोया, कॅरेटलेन या ब्रँडद्वारे दागिन्यांची विक्री करते. कंपनीने नव्या उत्पादनांद्वारे; तसेच ग्राहकांच्या गरजांना अनुसरून व्यवसाय करत एक मजबूत व्यावसायिक पोर्टफोलिओ तयार केला आहे.

सध्या कंपनीने जाहीर केलेल्या ‘पूर्व तिमाही निकाल अपडेट’नुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने वार्षिक आधारावर सुमारे २५ टक्के व्यवसायवृद्धी नोंदवली आहे. कंपनीने या तिमाहीत ७५ नव्या स्टोअरची वाढ केली आहे, ज्यामुळे कंपनीचे एकूण स्टोअरचे संख्याबळ ३१७१ झाले आहे.

दागिन्यांच्या व्यवसायाने २६ टक्के वृद्धी नोंदवली असून, २४ नव्या स्टोअरची भर पडली आहे, ज्यामुळे एकूण स्टोअरची संख्या ७२३ झाली आहे. सोने आयातीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे. कॅरेटलेन व्यवसायानेदेखील २८ टक्के वृद्धी नोंदवली आहे, जी या तिमाहीत सर्वाधिक आहे. असंघटित ते संघटित ज्वेलरकडे बाजारातील चालू असलेला बदल कंपनीसाठी सकारात्मक ठरत आहे.

कंपनीच्या घड्याळ व्यवसायातही २० टक्के वाढ झाली आहे. ॲनालॉग घड्याळांच्या विक्रीत विशेष वाढ दिसून आली असून, प्रीमियम ब्रँडमुळे विक्रीची संख्या वाढत आहे. आयवेअर (चष्मे) व्यवसायातही कंपनीने सहा टक्के वाढ नोंदवली असून, या विभागात दोन नव्या स्टोअरची भर पडली आहे. कंपनीच्या इतर व्यवसायांमध्येही प्रगती दिसून येत आहे.

‘तनेरा’ ब्रँडने (साडी व्यवसाय), फ्रेग्रन्सेस आणि फॅशन अॅक्सेसरीज यांसारख्या व्यवसायांमध्येही १४ टक्के वाढ नोंदली गेली आहे. विशेषतः ‘तनेरा’ व्यवसायाने ११ टक्के वृद्धी नोंदवली आहे, आणि फ्रेग्रन्सेस विभागाने १९ टक्के वृद्धी केली आहे. गुंतविलेल्या भांडवलावर २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत ही कंपनी व्यवसायवृद्धी करत आहे.

दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता जोखीम लक्षात घेऊन या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर - या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.