Toll Collection: टोल कंपन्या झाल्या मालामाल!'हा' महामार्ग ठरतोय सोन्याची अंडी देणारी कोंबडी, 499 कोटींची वसूली

Mumbai-Pune Highway Sees Highest Toll Collection : महाराष्ट्रातील मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई पुणे महामार्ग NH4 वरील टोल नाक्यावरून सर्वाधिक वसूली करण्यात आली आहे.
Toll Collection
Toll Collectionesakal
Updated on

राज्यात रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे विरोधक टोल बंद करण्याची मागणी करत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले. रस्ते खराब असताना आम्ही टोल का द्यावा, असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. असं असताना एका अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे. टोल कलेक्शनमध्ये 37 टक्के वाढ झाली आहे.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड आणि IRB इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट यांनी आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत 32 टक्के टोल वसुली वाढ नोंदविल्यानंतर दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीच्या महिन्यात, जुलै 2024 मध्येही हीच गती कायम ठेवली आहे. कंपनीने जुलै 2023 च्या तुलनेत जुलै 2024 मध्ये 37 टक्के वार्षिक टोल वसुली वाढ नोंदविली आहे.

महाराष्ट्रातील मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई पुणे महामार्ग NH4 वरील टोल नाक्यावरून सर्वाधिक वसूली करण्यात आली आहे. 2024 मध्ये 1352  मिलियन वसुली झाली आहे. तर 2023 ही 1349 मिलियन होती.

Toll Collection
Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 200 अंकांनी खाली; आयटी आणि मेटल शेअर्स कोसळले
Toll Collection Data
Toll Collection Dataesakal

IRB Infrastructure Developers Ltd आणि IRB Infrastructure Trust हे परिवहन पायाभूत सुविधा विकासक आणि खासगी पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट आहे. यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला.

कंपनीचा जुलै 2024 चा टोल कलेक्शन 499 कोटी रुपये असून जुलै 2023 मध्ये 365 कोटी रुपये होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत टोल कलेक्शनमध्ये 37 टक्के वाढ झाली आहे. या माहितीला IRB Infrastructure Developers Limited ने दुजोरा दिला आहे.

IRB हे भारतातील सर्वात मोठे एकात्मिक खासगी टोल रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासक असून, कंपनीकडे 12 राज्यांमध्ये सुमारे 80,000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Toll Collection
Check Clearance: चेक क्लियरिंगसाठी 2 दिवस वाट बघण्याची गरज नाही: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.