Employee Count: आर्थिक मंदीची चाहूल? देशातील आघाडीच्या टॉप 3 आयटी कंपन्यांमध्ये 63,759 कर्मचारी झाले कमी

IT Companies Headcount: आयटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. देशातील टॉप 3 आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण दिसून आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस आणि विप्रो यांनी दोन दशकांनंतर प्रथमच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण नोंदवली आहे.
Top 3 IT companies report 63,759 fall in FY24 headcount
IT Companies HeadcountSakal
Updated on

IT Companies Headcount: आयटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. देशातील टॉप 3 आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण दिसून आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस आणि विप्रो यांनी दोन दशकांनंतर प्रथमच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण नोंदवली आहे. TCS, Infosys आणि Wipro या तिन्ही कंपन्यांनी सांगितले की 20223-24 या आर्थिक वर्षात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) 12 एप्रिल रोजी तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या तीन IT कंपन्यांपैकी पहिली होती. कंपनीने सांगितले की 2023-24 आर्थिक वर्षाच्या शेवटी, TCS ची कर्मचारी संख्या 601,546 वर आली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 13,249 कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. 2022-23 मध्ये कंपनीची कर्मचारी संख्या 614,795 होती.

Top 3 IT companies report 63,759 fall in FY24 headcount
Narayana Murthy: नारायण मूर्तींचा 5 महिन्याचा नातू आहे करोडपती; एकाच महिन्यात कमावले 4.2 कोटी रुपये

18 एप्रिल 2024 रोजी, इन्फोसिसने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आणि कंपनीने सांगितले की 2023-24 या आर्थिक वर्षात, इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 25,994 ने घट झाली आहे.

इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची गेल्या 23 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या शेवटी, इन्फोसिसची कर्मचारी संख्या 3,17,240 होती, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 7.5 टक्के कमी आहे. 2022-23 आर्थिक वर्षाच्या शेवटी, इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची संख्या 3,43,234 होती.

2023-24 या आर्थिक वर्षात विप्रोच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. विप्रोच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 24,516 ने घट झाली असून कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 2,34,054 वर आली आहे. या तीन मोठ्या आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 63,759 ने कमी झाली आहे.

Top 3 IT companies report 63,759 fall in FY24 headcount
Everest Masala: 'धोकादायक' एव्हरेस्टच्या मसाल्यात कीटकनाशके? 'या' देशाने मसाला बाजारातून काढून टाकण्याचे दिले आदेश

जगभरातील मागणीत होणारी घसरण आणि ग्राहकांनी तंत्रज्ञानावरील खर्च कमी केल्यामुळे या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय चढ-उतारांमुळे भारताच्या IT सेवा उद्योगावर संकट निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()