Adani Group: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांची गेल्या काही वर्षांपासून आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सवर नजर होती. टीम खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. पण आता ही डील अहमदाबादच्या टोरेंट ग्रुपच्या नावावर असल्याची माहिती समोर येत आहे.
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, टोरेंट ग्रुपने गुजरात टायटन्समधील स्टेक खरेदी करण्यासाठी खासगी इक्विटी फर्म CVC कॅपिटल पार्टनर्ससोबत करार केला आहे.