Paytm: पेटीएमला मोठा धक्का! RBIच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या दोन स्वतंत्र संचालकांनी दिला राजीनामा

Paytm Payments Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर पेटीएम कंपनी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या दोन स्वतंत्र संचालकांनी राजीनामा दिला आहे. माहितीनुसार, शिंजिनी कुमार आणि मंजू अग्रवाल हे कंपनीच्या संचालकपदावरून पायउतार झाले आहेत.
Two independent directors quit Paytm Payments Bank board
Two independent directors quit Paytm Payments Bank board Sakal
Updated on

Paytm Payments Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर पेटीएम कंपनी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या दोन स्वतंत्र संचालकांनी राजीनामा दिला आहे. माहितीनुसार, शिंजिनी कुमार आणि मंजू अग्रवाल हे कंपनीच्या संचालकपदावरून पायउतार झाले आहेत. (Two directors exit Paytm Bank’s board)

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळावर आता फक्त तीन स्वतंत्र संचालक शिल्लक आहेत. यामध्ये पंजाब अँड सिंध बँकेचे माजी कार्यकारी संचालक अरविंद कुमार जैन, एक्सेंचरचे माजी एमडी पंकज वैश आणि डीपीआयआयटीचे माजी सचिव रमेश अभिषेक यांचा समावेश आहे. मात्र, संचालकांच्या राजीनाम्याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (Two independent directors quit Paytm Payments Bank board)

Two independent directors quit Paytm Payments Bank board
Sovereign Gold Bond: स्वस्त सोने घ्यायचे असेल तर पैसे ठेवा तयार; मोदी सरकारची सुवर्ण योजना 'या' तारखेला होणार सुरू

अलीकडेच आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. आरबीआयने मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सेवांवर बंदी घातली आहे. फक्त पैसे ट्रान्सफर आणि पैसे काढण्याची परवानगी असेल.

परंतु तुम्ही 29 फेब्रुवारीपासून तुमचे वॉलेट किंवा फास्टॅग टॉप अप करू शकणार नाही. तसेच तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा करू शकणार नाहीत. कंपनीचे सीईओ विजय शेअर शर्मा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआय अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे.

Two independent directors quit Paytm Payments Bank board
Multibagger Stock: एका वर्षात 'या' शेअरमध्ये 150 टक्के वाढ, नव्या व्यवसायातील एन्ट्रीमुळे तेजीचा तज्ज्ञांचा विश्वास

पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर डिजिटल पेमेंटबाबत लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. परंतु कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) असा दावा केला आहे की डिजिटल पेमेंटसाठी व्यापारी आणि ग्राहक यांच्यात निर्माण झालेला विश्वास कायम राहील. पेटीएम विरोधात घेतलेल्या निर्णयाचा डिजिटल पेमेंट प्रणालीवर कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.