SEBI-NISM Conference : बाजारातील फुगवटा गंभीर नाही; ‘सेबी-एनआयएसएम’ परिषदेत उदय कोटक यांचे प्रतिपादन

स्मॉल कॅप, मिड कॅप शेअरच्या उच्च भाववाढीबाबत भांडवल बाजार नियामकासह विविध स्तरांवर चिंता व्यक्त होत असताना, भारतीय शेअर बाजारातील फुगवटा गंभीर नाही, बाजार नियंत्रणात आहे
Uday Kotak at SEBI-NISM conference over share Market concerns
Uday Kotak at SEBI-NISM conference over share Market concernsSakal
Updated on

मुंबई : स्मॉल कॅप, मिड कॅप शेअरच्या उच्च भाववाढीबाबत भांडवल बाजार नियामकासह विविध स्तरांवर चिंता व्यक्त होत असताना, भारतीय शेअर बाजारातील फुगवटा गंभीर नाही, बाजार नियंत्रणात आहे, असे मत वित्तीय सेवा उद्योगातील दिग्गज उदय कोटक यांनी व्यक्त केले आहे. ‘सेबी-एनआयएसएम’ परिषदेत ते आज येथे बोलत होते.

‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी दोन दिवसांपूर्वीच, स्मॉल आणि मिड-कॅप शेअरच्या भावातील वाढ म्हणजे फुगवटा आहे आणि भांडवल बाजार नियामक त्यावर उपाययोजनांचा विचार करत आहे. असा फुगवटा फुटल्यास गुंतवणूकदारांवर विपरित परिणाम होतो. ही चांगली गोष्ट नाही, असे म्हटले होते. त्यावर खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि बिगर कार्यकारी संचालक कोटक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

उदय कोटक यांनी अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांचा हवाला देत, अंदाज, अनुमान व्यक्त करणे हे वाईट नाही असेही नमूद केले. जपानी शेअर बाजारामधील १९८० ते १९८९ दरम्यान आलेल्या फुगवट्याचाही उल्लेख त्यांनी केला.

हा फुगा फुटल्यानंतर ३५ वर्षांनंतर निक्केई त्याच्या शिखरावर परत येऊ शकला आहे. भारतीय शेअर बाजारात असा फुगवटा नाही आणि अशा फुगवट्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजनाही व्यवस्थेत आहे. जोपर्यंत आपण बारकाईने लक्ष ठेवतो आणि चांगले व्यवस्थापन करतो, तोपर्यंत शाश्वत भांडवल निर्मिती करू शकतो, असेही कोटक यांनी स्पष्ट केले.

शेअरमधील नफ्यावरील लाभांशांवर आकारल्या जाणाऱ्या दुहेरी करासह विविध प्रकारांतील करआकारणीमध्ये काही प्रमाणात सुसूत्रता आणली पाहिजे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.