Uday Kotak: देशातील दिग्गज उद्योगपती उदय कोटक यांनी क्विक कॉमर्स कंपन्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतातील पारंपारिक किरकोळ विक्रेत्यांवर क्विक कॉमर्स कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम झाला आहे. कोटक यांची टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा स्विगी या भारतीय क्विक कॉमर्स मार्केटमधील प्रमुख कंपनीने शेअर बाजारात नुकतीच एन्ट्री केली आहे.