World Most Valuable Diamond: जगातील सर्वात महाग 'गुलाबी' हिऱ्याचा झाला लिलाव; किंमत ऐकून व्हाल थक्क!

जगातील दुर्मिळ हिऱ्याची नुकतीच विक्री झाली आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
World Most Valuable Diamond
World Most Valuable DiamondSakal
Updated on

World Most Valuable Diamond: जगातील दुर्मिळ हिऱ्याची नुकतीच विक्री झाली आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 55.2 कॅरेटच्या या दुर्मिळ हिऱ्याचा न्यूयॉर्कमध्ये लिलाव करण्यात आला. CNN च्या रिपोर्टनुसार, हा हिरा दुर्मिळ गुलाबी हिऱ्याच्या लिलावात विकला गेला. त्याच्या प्रकारातील सर्वात मोठा आणि सर्वात मौल्यवान हिरा बनला आहे.

या हिऱ्याचा लिलाव या महिन्याच्या सुरुवातीला झाला होता. कॅनेडियन फर्म फ्युरा जेम्सला मोझांबिक, आफ्रिकेतील कंपनीच्या एका खाणीत हा हिरा सापडला होता.

यासोबतच सोथेबीज मॅग्रिफिसेंट ज्वेल्समध्ये आणखी एका गुलाबी हिऱ्याचा 30 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीला लिलाव करण्यात आला.

दुर्मिळ 'गुलाबी' हिऱ्याने जागतिक विक्रम केला:

फॅन्सी आणि गुलाबी रंगाच्या या हिऱ्याने जागतिक विक्रम केला आहे. हा जगातील सर्वात महागडा हिरा आहे, जो करोडोंमध्ये विकला गेला आहे.

हा हिरा 34.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 287 कोटी रुपयांना विकला गेला आहे. ज्याला "द इटरनल पिंक" असे नाव देण्यात आले आहे. लिलावापूर्वी हा हिरा अंदाजे 35 दशलक्ष डॉलर्सला विकला जाईल असा अंदाज होता.

World Most Valuable Diamond
Income Tax : प्राप्तिकर विभागाच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत तर असे होतील परिणाम

2019 मध्ये सर्वात महागडा हिरा विकला गेला:

या हिऱ्यापूर्वी, जांभळ्या-गुलाबी हिऱ्याचा यापूर्वीचा विक्रम 2019 मध्ये झाला होता. जेव्हा हाँगकाँगमधील सोथेबी येथे 10.64 कॅरेटचा हिरा 19.9 दशलक्ष डॉलर्सला विकला गेला. फोर्ब्सच्या मते, त्यावेळी इतर रत्नांच्या तुलनेत हे सर्वात महाग आणि मौल्यवान रत्न होते.

बोत्सवानामधील दमात्शा खाणीत डी बियर्सने "द इटरनल पिंक" शोधला होता. त्याचे नाव एस्ट्रेला डी फुरा आहे, ज्याचा पोर्तुगीजमध्ये स्टार ऑफ फुरा असा अर्थ आहे.

Sotheby's ने त्याचे वर्णन बाजारात आलेला सर्वात तेजस्वी गुलाबी हिरा म्हणून केला आहे. यासोबतच त्याला सर्वात मौल्यवान दगड म्हणूनही नाव देण्यात आले आहे.

World Most Valuable Diamond
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()