N Srinivasan: बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी घेतली सिमेंट व्यवसायातून माघार; बिर्लांना इतक्या कोटींना विकली कंपनी

Ultratech Cement Share: एन.श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट लिमिटेडची कमान येत्या काही दिवसांत अल्ट्राटेक सिमेंटकडे सोपवली जाणार आहे. 28 जुलै रोजी, अल्ट्राटेक सिमेंटने स्टॉक एक्स्चेंजला कळवले की बोर्डाने इंडिया सिमेंट लिमिटेडमधील अतिरिक्त 32.72 टक्के हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
Ultratech Cement
Ultratech Cement ShareSakal
Updated on

India Cement ltd: एन श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट लिमिटेडची कमान येत्या काही दिवसांत अल्ट्राटेक सिमेंटकडे सोपवली जाणार आहे. 28 जुलै रोजी, अल्ट्राटेक सिमेंटने स्टॉक एक्स्चेंजला कळवले की बोर्डाने इंडिया सिमेंट लिमिटेडमधील अतिरिक्त 32.72 टक्के हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

हा करार पूर्ण झाल्यानंतर, इंडिया सिमेंट्समधील अल्ट्राटेक सिमेंटची एकूण भागीदारी 55 टक्क्यांहून अधिक होईल. जूनमध्ये, अल्ट्राटेक सिमेंटने इंडिया सिमेंटमधील 22.77 टक्के हिस्सा 268 रुपये प्रति शेअर या दराने विकत घेतला होता.

अल्ट्राटेक सिमेंट इंडिया सिमेंट लिमिटेडचा 32.72 टक्के हिस्सा 3954 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. अल्ट्राटेक सिमेंटच्या बोर्डाने इंडिया सिमेंट लिमिटेडच्या प्रवर्तकांकडून 32.72 टक्के भागभांडवल 390 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

एन श्रीनिवासन हिस्सा का विकत आहेत?

एन श्रीनिवासन पुढील वर्षी जानेवारीत 80 वर्षांचे होतील. वडिलांच्या निधनानंतर ते 1989 पासून इंडिया सिमेंट लिमिटेडचे ​​प्रमुख होते.

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, त्यांची मुलगी रूपा गुरुनाथ आणि त्यांची पत्नी चित्रा श्रीनिवास यांना या व्यवसायात फारसा रस नाही. त्याचवेळी एन श्रीनिवासन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आधीच माघार घेतली होती.

Ultratech Cement
LinkedIn: 9 ते 5 शिफ्ट इतिहास जमा होणार; लिंक्डइनच्या सह-संस्थापकाचं भाकीत, कोण जास्त पैसे कमावणार?

अल्ट्राटेकने सांगितले की, 'रेग्युलेटर्सकडून सर्व मंजुरी मिळाल्यानंतर ओपन ऑफर केली जाईल.' गेल्या महिन्यात 22.77 टक्के स्टेक 268 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करण्यासाठी अल्ट्राटेकने 1,889 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

कंपनीने हे शेअर्स गुंतवणूकदार राधाकृष्ण दमाणी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून खुल्या बाजारात खरेदी केले होते.

अल्ट्राटेकने सांगितले की, 'जूनमध्ये केलेल्या गुंतवणुकीनंतर प्रवर्तक समूहाने कंपनीतील त्यांचा हिस्सा विकण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता.

इंडिया सिमेंटची एकूण उत्पादन क्षमता वार्षिक 1.44 कोटी टन आहे. यापैकी वार्षिक 1.29 कोटी टन क्षमतेचे कारखाने दक्षिण भारतात आहेत (विशेषतः तामिळनाडू) आणि 15 लाख टन वार्षिक क्षमता असलेले कारखाने राजस्थानमध्ये आहेत. या करारासाठी नियामकांकडून पुढील 6 महिन्यांत मंजुरी अपेक्षित आहे.

Ultratech Cement
Sovereign Gold Bond: गुंतवणूकदारांना मोठा धक्का! सरकार SGB योजना बंद करण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, "गेल्या काही वर्षांत अल्ट्राटेक सिमेंटने भारताला इमारत बांधकामात जागतिक आघाडीवर नेण्याच्या उद्देशाने गुंतवणूक केली आहे."

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, इंडिया सिमेंट्सने आम्हाला चांगली संधी दिली आहे कारण ते अल्ट्राटेकला दक्षिण भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.