Unemployment Rate: आनंदाची बातमी! शहरी बेरोजगारीचा दर 5 वर्षांच्या नीचांकावर; काय आहे कारण?

Unemployment Rate: देशातील कामगार संख्या वाढल्याने शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 6.5 टक्क्यांवर घसरला आहे, जो मागील तिमाहीत 6.6 टक्के होता. नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने (NSO) सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली.
Unemployment rate declines to 6.5 per cent in Oct-Dec
Unemployment rate declines to 6.5 per cent in Oct-Dec Sakal
Updated on

Unemployment Rate: देशातील कामगार संख्या वाढल्याने शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 6.5 टक्क्यांवर घसरला आहे, जो मागील तिमाहीत 6.6 टक्के होता. नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने (NSO) सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली.

एप्रिल-जून दरम्यान, आर्थिक वर्ष 2022 च्या तिमाहीत शहरी भागातील बेरोजगारीचा दर 12.6 टक्क्यांपर्यंत वाढला होता. NSO द्वारे जाहीर केलेल्या पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) च्या डेटावरून असे दिसून आले आहे की, FY 2022 च्या एप्रिल-जून तिमाहीपासून बेरोजगारीचा दर सतत घसरत आहे.

डिसेंबर 2018 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचा त्रैमासिक शहरी बेरोजगारी दर जाहीर केल्यापासून डिसेंबर तिमाहीत 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बेरोजगारीचा दर हा गेल्या 5 वर्षांतील सर्वात कमी आहे.

Unemployment rate declines to 6.5 per cent in Oct-Dec
UPI Payment: आजपासून श्रीलंका, मॉरिशसमध्ये UPI पेमेंट सेवा सुरू; पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

या तिमाहीत महिलांचा बेरोजगारीचा दर 8.6 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे, तर पुरुषांचा बेरोजगारीचा दर मागील तिमाहीत 6 टक्क्यांवरून 5.8 टक्क्यांवर घसरला आहे. 2022 च्या एप्रिल-जून तिमाहीपासून ही आकडेवारी देखील कमी होत आहे, जेव्हा महिला आणि पुरुषांसाठी बेरोजगारीचा दर अनुक्रमे 12.2 टक्के आणि 14.3 टक्के असल्याचा अंदाज होता.

तरुणांमधील बेरोजगारीचा दर (15ते 29 वयोगटातील) तिसऱ्या तिमाहीत झपाट्याने कमी होऊन 16.5 टक्के झाला आहे, जो दुसऱ्या तिमाहीत 17.3 टक्के होता. हे आकडे महत्त्वाचे आहेत कारण या वयोगटातील लोक सामान्यत: श्रमिक बाजारात प्रथमच प्रवेश करणारे असतात.

Unemployment rate declines to 6.5 per cent in Oct-Dec
Retail Inflation : किरकोळ महागाईत घसरण; जानेवारीत दर ५.१० टक्क्यांवर

ताज्या त्रैमासिक सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की शहरी भागात काम करणाऱ्या किंवा काम शोधणाऱ्या लोकांची संख्या मोजणारा श्रमशक्ती सहभाग दर (LFPR) डिसेंबर तिमाहीत वाढून 49.9 टक्के झाला आहे.

डिसेंबर तिमाहीत पगारदार नोकऱ्यांचा वाटा अनुक्रमे 47.3 टक्के आणि 53 टक्के झाला आहे, जो मागील तिमाहीत अनुक्रमे 47 टक्के आणि 52.8 टक्के होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.