Unemployment Rate: बेरोजगारीच्या दराने गाठला दोन वर्षांतील उच्चांक, निवडणुकीपूर्वी सरकारची चिंता वाढली

Unemployment Rate: भारतात बेरोजगारी 2 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.
Unemployment rate in October rises to more than two-year high, says CMIE
Unemployment rate in October rises to more than two-year high, says CMIE Sakal
Updated on

Unemployment Rate: छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी आलेले हे बेरोजगारीचे आकडे सरकारची चिंता वाढवू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, भारताचा जीडीपी 6 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे, पण तरीही त्या गतीने तरुणांसाठी नवीन रोजगार निर्माण होत नाहीत. अशा स्थितीत आगामी निवडणुकीत हा मोठा मुद्दा बनू शकतो.

खाजगी संशोधन संस्था CMIE ने दावा केला आहे की ऑक्टोबर 2023 मध्ये भारतात बेरोजगारी 2 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.

देशातील ग्रामीण भागात बेरोजगारी अधिक वाढली आहे. त्याचा परिणाम एकूण बेरोजगारीच्या दरावर दिसून येत आहे. बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी लिमिटेडने ही माहिती दिली. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 10.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सप्टेंबर 2023 मध्ये बेरोजगारीचा दर 7.09 टक्के होता.

Unemployment rate in October rises to more than two-year high, says CMIE
Reliance SBI Card: रिलायन्स एसबीआय कार्ड लॉन्च, ग्राहकांना मिळणार जबरदस्त ऑफर्स

सरकारी पदे रिक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 10 लाख भरती करण्याची घोषणा केली आहे. परंतु आकडेवारीवरून असे दिसून आले की, गेल्या 8 वर्षांत अर्ज केलेल्या लोकांपैकी केवळ 0.3% लोकांना नोकऱ्या दिल्या.

कृषी क्षेत्रात बेरोजगारी वाढत आहे. अनियमित पाऊस आणि उष्णतेच्या लाटेमुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कृषी उत्पादनात 4.5% वाढ झाली, जी सर्वात कमी वाढ आहे.

Unemployment rate in October rises to more than two-year high, says CMIE
GST Collection: दिवाळीपूर्वी सरकारी तिजोरीत पैशांचा पाऊस, जीएसटी संकलन 1.72 लाख कोटींवर

सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास म्हणाले, 'हा महिना वाईट गेला आहे. भारतात चाळीस लाख लोक आहेत पण ते बेरोजगार आहेत. जुलैच्या तुलनेत अर्थव्यवस्था घसरली आहे त्यामुळे लोकांना रोजगार मिळत नाही.

व्यास म्हणाले की, 'ग्रामीण भारतातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. आतापर्यंत पाऊस फारसा चांगला न झाल्याने भारतात पेरण्याही कमी झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.